पंढरपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केवळ वारकरी संप्रदायाचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे वंदनीय स्थान असलेले पंढरपूर तीर्थक्षेत्र सध्या वादात सापडले आहे. किंबहुना राजकीय वातावरणात चंद्रभागेचे पाणी पेटले आहे, असे दिसून येते. याला कारण म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी कॉरिडॉर करण्याचा घाट घातला असतानाच दुसरीकडे भाजपचे स्थानिक नेते याला विरोध करत आहेत. त्याचवेळी एका राष्ट्रीय नेत्यांनी फडणवीस यांना कडक शब्दात इशारा दिला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी पंढरपूर येथे आले असता त्यांना पत्रकारांनी फडणवीसांच्या भूमिकेवरुन प्रश्न विचारला. त्यावर स्वामींनी म्हटले की, मी आव्हान देऊन सांगतो की, नाही होणार आणि तो जास्त बोलला तर उपमुख्यमंत्रीपदीही राहणार नाही, असे म्हणत फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत मत मांडले. एकीकडे वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार तज्ज्ञ मंडळींच्या सल्ल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला आहे. परंतु दुसरीकडे हा आराखडा राबविताना विठ्ठल मंदिर परिसरासह अन्य भागातील मिळकती बाधित होणार असल्यामुळे संबंधित मिळकतदारांसह व्यापाऱ्यांनी या आराखड्याला तीव्र विरोध केला आहे.
पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकार मुक्त करण्यावर चर्चेसाठी भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी पंढरपूरमध्ये आले होते. यावेळी पंढरपूर कॉरिडोर प्रकल्पावर बोलताना त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. पंढरपूर विकास आराखड्याला येथील स्थानिकांनी विरोध केला आहे. यावरून नागरिकांनी मुंबईत येऊन माझी भेट घेतली आणि सदर विषयात हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती, अशी माहिती सुब्रमण्यम स्वामी यांनी दिली.
विशेष म्हणजे भाजपात असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात खळबळजनक बोलणाऱ्या सुब्रमण्यम स्वामी यांनी पंढरपुरातही अनेक बेधडक वक्तव्य केली. सध्या तीर्थक्षेत्र पंढरपूरमधील कॉरिडॉरच्या मुद्द्यावरुन स्थानिक पातळीवरील राजाकरण चांगलेच तापले आहे. वाराणसी आणि तिरूपतीच्या धर्तीवर तीर्थक्षेत्र पंढरपूर कॉरिडॉर होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३० कोटी ७० लाख रूपये खर्चा विकास आराखडा तयार केला असताना हा कॉरिडॉर रद्द व्हावा, या मागणीसाठी पंढरपुरात सर्वपक्षीय आंदोलन सुरू आहे.
https://twitter.com/Swamy39/status/1606658983510835201?s=20&t=M587LFlvcjTZxmdFow_rqA
महत्त्वाचे म्हणजे सदर कॉरिडॉर रद्द न झाल्यास स्थानिक भारतीय जनता पार्टीच्या पदाधिका-यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे. इतके नव्हे तर काहीजण कॉरिडॉरच्या मुद्यावर पंढरपूर कर्नाटकला जोडण्याची आणि पुढच्या वर्षी आषाढी यात्रेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या महापूजेसाठी आमंत्रित करण्याची भाषा बोलत आहेत. त्याच वेळी पंढरपूर कॉरिडॉर रद्द न झाल्यास पंढरपूर शहर व तालुक्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील असा इशारा पंढरपूर शहर भाजपाचे अध्यक्ष विक्रम शिरसाट यांनी दिला. पक्षाचे नेते, माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करून त्याबाबतची निवेदने मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून दिली आहेत. या कॉरिडोरवरून कुणा-कुणाला नोटीसा पाठवणे हे चालणार नाही, असा इशारा सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे.
भाजपाचे मोदी सरकार देशातील मंदिरे स्वतःच्या अधिपत्याखाली घेत आहे, असा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. उत्तराखंडमधील अनेक मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. पंढरपूर मंदिर सरकार मुक्त करण्यासाठी जानेवारीत जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. देशातील साधूंच्या ताब्यात इथली मंदिर द्या, अशी मागणीही माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदुत्ववादी नाहीत. असे धक्कादायक विधान भाजपचे माजी खासदार डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. त्यांनी उत्तराखंडमध्ये अनेक मंदिरे सरकारीकरण केले. न्यायालयात जाऊन ती मुक्त करणार असून मी भाजपच्या जाहीरनाम्या नुसार काम करेल, असेही ते म्हणाले.
https://twitter.com/Kamlesh14221399/status/1607374644457373696?s=20&t=M587LFlvcjTZxmdFow_rqA
Politics DYCM Devendra Fadanvis BJP Leader Criticism
Subramanyam Swami Pandharpur Corridor