India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

असे आहे भाजपचे मिशन लोकसभा २०२४; महाराष्ट्रातून अशी होणार सुरुवात

India Darpan by India Darpan
January 2, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २०२३ या वर्षाला प्रारंभ होताच भारतीय जनता पक्षाने पुढील वर्षी म्हणजे २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला प्रारंभ केला आहे. २०२३ मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सरकार आणि संघटना या दोघांचेही स्वरूप बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काळात या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा सोमवारी महाराष्ट्रात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या निवडणूकपूर्व प्रचाराची सुरुवात करणार आहेत. ‘लोकसभा प्रवास योजने’अंतर्गत नड्डा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाला भेट देतील आणि पक्ष आणि जाहीर सभांची मालिका घेणार आहेत.

२०२४च्या लोकसभा निवडणुका एप्रिल-मेमध्ये होणार असल्या तरी भाजपने देशभरात तयारी सुरू केली आहे. निवडणूकपूर्व प्रचार सुरू करण्यासाठी नड्डा प्रत्येक राज्यात ‘प्रवास’ करणार आहेत. एकूण ५४५ लोकसभा मतदारसंघांपैकी, पक्षाने १६० मतदारसंघ निवडले आहेत. जेथे त्यांना कठीण लढा द्यावा लागेल. महाराष्ट्रात १४४ मतदारसंघ आहेत, त्यापैकी १८ भाजपसाठी अवघड आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री रावसाहेब दानवे यांसारखे दिग्गज नेते नड्डा यांच्या एकदिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर त्यांच्यासोबत असतील.

नड्डांचा कार्यकाळ संपतोय
यावर्षी म्हणजे २०२३ मध्ये राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, त्रिपुरा, मेघालय, नागालँड, मिझोराम आणि जम्मू आणि काश्मीरसह १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळही याच महिन्यात संपत आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकही याच महिन्यात होणार आहे. त्यामुळे नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत वाढविला जाण्याची अधिकृत घोषणाही जानेवारीतच होण्याची शक्यता आहे. नड्डा यांचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढला तरी त्यांच्या संघात मोठा बदल होणार आहे आणि हा बदल पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांपासून राज्य प्रभारी आणि सहकाऱ्यांपर्यंत नक्कीच होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Politics BJP Mission Loksabha 2024 Maharashtra Starting
Election Campaign J P Nadda


Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – प्रामाणिकपणाचा खरा अर्थ

Next Post

८ जिल्हे… ३९ क्रीडा प्रकार…. १० हजार ४५६ खेळाडू… पुण्यात ५ जानेवारीपासून मिनी ऑलिम्पिक स्पर्धा

Next Post

८ जिल्हे... ३९ क्रीडा प्रकार.... १० हजार ४५६ खेळाडू... पुण्यात ५ जानेवारीपासून मिनी ऑलिम्पिक स्पर्धा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group