मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बाबरी पाडली त्यात बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांचा संबंध नाही, असा दावा करुन भाजप नेते व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण पेटले आहे. त्यांच्या या विधानानंतर खासदार संजय राऊत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदींनी पाटील यांच्यावर जोरदार तोंडसुख घेतले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या या वक्तव्यानंतर आज पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका पुन्हा स्पष्ट केली. ते म्हणाले की, माझ्यासारख्या मुंबईत राहणाऱ्या सामान्य नागरिकाच्या मनामध्ये स्व. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल नेहमी श्रद्धाच राहिली आहे. बाळासाहेबांमुळे अशा अनेक हिंदुत्ववादी विषयांना चालना मिळाली, असे ते म्हणाले. तसेच, बाळासाहेबांविषयी मला नितांत आदर आहे. माझे वक्तव्य हे खासदार संजय राऊत यांच्याविषयी होते. बाबरी पाडली त्यावेळी ते कुठे होते, त्यांचा आणि बाबरीचा काहीही संबंध नाही, असे मी म्हणालो होतो असा खुलासा पाटील यांनी केला आहे.
बघा, पाटील यांची आजची पत्रकार परिषद
https://twitter.com/ChDadaPatil/status/1645698692543033344?s=20
Politics BJP Leader Chandrakant patil Statement on Balasaheb Thackeray