गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

रामशेजच्या पोटात आढळल्या ११ गुहा; शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या शोध मोहिमेत आढळला दुर्मिळ वारसा

by India Darpan
एप्रिल 11, 2023 | 5:10 pm
in स्थानिक बातम्या
0
FB IMG 1681209541112

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या १६९ व्या दुर्गशोध अभ्यास मोहिम (दि ९/४/२०२३ रोजी) झाली. या दुर्गशोध मोहिमेत दुर्गसंवर्धकांनी रामशेजच्या कड्याकपरीचा चाहुबाजूने अभ्यासात्मक शोध घेतला. त्यात रामशेजच्या नैसर्गिक कातीव अभेद्य कड्याच्या पोटात एकूण ११ गुहा आढळल्या, तर चाहुबाजूने अतिशय दुर्मिळ वनस्पती, वनौषधी वृक्ष व विविध पक्षी आढळले,कडाक्याच्या उन्हात यावेळी दुर्गसंवर्धकांनी 3 गट तयार करून दिवसभरात ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली.यापुढेही या मोहिमेचा दुसरा टप्पा होईल असे शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक तथा दुर्गअभ्यासक राम खुर्दळ यांनी सांगितले.

नाशिकची शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था गेल्या 2000 सालापासून अखंडीपणे नाशिक जिल्ह्यातील ६० हुन अधिक किल्ल्याच्या संवर्धन,११ प्राचीन होळकर बारवा,ज्ञात अज्ञात विरगळी व ऐतिहासिक ठेवा शोध,पावसाळ्यात वृक्षारोपण,बीजारोपण,व उन्हाळ्यात लागणारे वणवे विझवण्यात स्वखर्चाने व श्रमदानातून राबत आहे.अजिंक्य दुर्ग रामशेजच्या २३ वर्षे अभ्यासपूर्ण पद्धत्तीने अखंडित दुर्गसंवर्धन मोहिमा करून येथील झुडपात मातील नष्ट होणारा,ऐतिहाशिक ठेवा,विविध जलश्रोत,दुर्मिळ झाडे,तसेच दुर्गजागृती साठी अविरतपणे राबत आहे.

यावेळी रविवारच्या मोहिमेत रामशेजच्या चाहुबाजुने ज्ञात अज्ञात ऐतिहाशिक,नैसर्गिक पाऊलखुणा,व दुर्मिळ जैवविविधतेच्या शोध अभ्यास मोहीम झाली,या।मोहिमेत तीन गट केले,एक गट रामशेजच्या कपरींचा सुरक्षित शोध घेत तर दुसरा मध्यभागी जलश्रोत शोध,व तिसरा चाहुबाजूने दुर्मिळ वनस्पती शोध घेत होते,त्यात रामशेजच्या कपारीत ११ गुहा आढळल्या,मध्यभागी विविध घळीत कातीव असंख्य दगड,गोलाकार दगडी आढळली तर किल्ल्याच्या चाहुबाजूने पिंपळ,बाभूळ,काटे-साबर,भोकर,दैवस,अडुळसा,गुर्तुली,शेकडो वर्षे जुने उंबराचे झाड, चिंच, चिलार, अडुळसा, कोरपड, साबर, हिवर, सिंदल, चाफा, करवंद, रानमोगरा तसेच पश्चिम पोटात वनविभागाने लावलेली बांबू व सागाची काही झाडे आढळली.

या वृक्षांत बहुतांशी दुर्मिळ वनस्पती औषधी प्रकारातील आहे.तर काही फुले,फळे देणारी व काही जाळी,कुंपण तयार करणारे वृक्ष आहेत,दरम्यान याठिकाणी दरवर्षी लागणारा वणवा यामुळे मात्र या दुर्मिळ वनस्पती सोबत येथील मोर,दुर्मिळ लाहुरी पक्षी, गुहेत असणारा ससाणा विस्तापित होत आहे.याकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे.येथील वणवा लागतो कुठून याचा शोध वनविभागाने घ्यावा अशी मागणी ही दुर्ग व वृक्षमित्रांनी यावेळी केली.

दरम्यान रामशेज युद्धात वापरलेली दगड गोटे अधिक प्रमाणात किल्ल्याच्या चाहुबाजूने दिसतात,तर किल्ल्यावर कातलेली बांधकामाची असंख्य दगड घळीत पडलेली आहेत.मोहिमेच्या अखेरीस येत्या १४ मे रोजी रामशेजच्या माथ्यावर गोमुखी द्वारात होणाऱ्या छत्रपती शंभूराजे जन्मोत्सव नियोजन बैठकीत विविध जबाबदारीचे प्रयोजन करण्यात आले.

Nashik Ramshej Fort Guha Conservation

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बागलाणच्या पश्चिम भागातील गारपीटग्रस्त शेतीची आजी-माजी आमदारांकडून पाहणी, केली ही मागणी

Next Post

चंद्रकांत पाटलांचे बाळासाहेब ठाकरेंविषयी वादग्रस्त वक्तव्य; राज्यातील राजकारण पेटले (व्हिडिओ)

India Darpan

Next Post
chandrakant patil e1654165658983

चंद्रकांत पाटलांचे बाळासाहेब ठाकरेंविषयी वादग्रस्त वक्तव्य; राज्यातील राजकारण पेटले (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011