India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा उद्यापासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर; असे आहेत त्यांचे भरगच्च कार्यक्रम

India Darpan by India Darpan
May 16, 2023
in राज्य
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे १७ व १८ मे रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. १८ मे रोजी पुणे येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप श्री. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. श्री. नड्डा यांच्या उपस्थितीत मुंबईत केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थींशी संवाद, बुद्धीमंतांशी संवाद असे विविध कार्यक्रम होणार आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आ.आशीष शेलार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला खा. मनोज कोटक, विधान परिषदेतील भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.

श्री. बावनकुळे यांनी सांगितले की, भाजपा प्रदेश कार्यकारिणीची एक दिवसीय बैठक पुणे येथे गुरुवार १८ मे रोजी होत आहे. प्रदेश कार्यकारिणीचे सुमारे दीड हजार सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचा समारोप राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नड्डा यांच्या भाषणाने होणार आहे. या बैठकीनंतर श्री. नड्डा हे राज्यातल्या खासदार, आमदारांच्या बैठकीत मार्गदर्शन करतील. त्यानंतर ते राज्यातील केंद्रीय मंत्री व राज्यातले मंत्री यांच्याशी संवाद साधणार आहेत.

श्री. शेलार यांनी सांगितले की, श्री. नड्डा यांचे बुधवारी १७ मे रोजी सकाळी ११ वाजता आगमन होणार असून सायन – पनवेल मार्गावर देवनार येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला अभिवादन करून त्यांच्या मुंबईतील कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे. घाटकोपर – मानखुर्द लिंक रोडवर आरबीके हॉल येथे लाभार्थी संवाद, बोरिवली येथील अटल स्मृती उद्यानात बुद्धीमंत संवाद, चारकोप येथे पन्ना प्रमुख बैठकीत सहभाग, मुंबईतील पक्षाच्या मोर्चा, आघाडी प्रमुखांशी संवाद असे विविध कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत होणार आहेत.

या दरम्यान श्री. नड्डा हे रमाबाई आंबेडकर नगरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादनही करणार आहेत. १८ मे रोजी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद, युवक संवाद या कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. या दरम्यान ते सिद्धिविनायकाचे दर्शन घेणार आहेत. तसेच दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सदनालाही भेट देणार आहेत.

📍प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजप कार्यालय नरिमन पॉइंट येथे माध्यमांशी संवाद@cbawankule https://t.co/scSB43NkHU

— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) May 16, 2023

Politics BJP Chief JP Nadda Maharashtra Visit


Previous Post

धक्कादायक! आंदोलक कुस्तीपटूंचे ऐकण्याऐवजी निरीक्षण समितीने त्यांनाच सुनावलं… म्हणाले, ‘ब्रिजभूषण वडिलांसारखे…’

Next Post

भारतात पाऊस उशीरा येईल का? आगामी काही दिवस हवामान कसे असेल? घ्या जाणून…

Next Post

भारतात पाऊस उशीरा येईल का? आगामी काही दिवस हवामान कसे असेल? घ्या जाणून...

ताज्या बातम्या

ना मंत्री, ना लवाजमा.. अत्यंत साध्या पद्धतीने लग्न… अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कन्येचा विवाह… हा आहे त्यांचा जावई

June 9, 2023

‘हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेने मागितली माफी… हे आहे प्रकरण

June 9, 2023

उर्फी जावेद करणार या आजोबांचा महिन्याचा खर्च; कोण आहेत ते?

June 9, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

शिक्षण विभागाचा आणखी एक सावळा गोंधळ; आता गणवेशावरुन काढले हे आदेश

June 9, 2023

धक्कादायक! इंदिरा गांधींच्या हत्येचा चित्ररथ चालवला… खलिस्तानी समर्थकांचे कॅनडात कृत्य… सर्वत्र संताप

June 9, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा तीन दिवसांच्या रजेवर; आता कुठे गेले?

June 9, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group