सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शहा आणि नड्डांनी केली केंद्रीय मंत्र्यांची कानउघाडणी; दिले हे स्पष्ट निर्देश

by Gautam Sancheti
सप्टेंबर 8, 2022 | 1:05 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
J P Nadda Amit Shah

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपने मिशन २०२४ ची तयारी जोरात सुरू केली असून हे काम अगदी केंद्रीय मंत्र्यांनाही देण्यात आले आहे. मात्र, केंद्रीय मंत्र्यांची गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी चांगलीच कानउघाडणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आढावा बैठक घेतली आहे. केंद्रीय मंत्री हे लोकसभा मतदारसंघांना भेट देत नसल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभा मतदारसंघात जाऊन संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे टार्गेट या मंत्र्यांना देण्यात आले आहे.

लोकसभेच्या एकूण १४४ जागा निवडून आणण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांना देण्यात आली आहे. या जागांवर भाजपला यापूर्वी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आता या सर्व जागा घेऊन २०२४ मध्ये ३५० चा आकडा पार करण्याची पक्षाची रणनीती आहे. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत अमित शहा मंत्र्यांना म्हणाले की, ‘आम्ही केवळ संघटनेमुळे येथे आलो आहोत. संघटना आहे म्हणून हे सरकार आहे. संघटनेला नेहमीच प्राधान्य दिले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप लोकप्रिय आहेत. मोदींच्या नावावर कोणीही जिंकू शकतो. पण जर जमिनीवर संघटना नसेल तर त्याचा फायदा आपल्याला घेता येणार नाही. ‘गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत. २०१४ मध्ये आम्ही गमावलेल्या ३० टक्के जागा २०१९ मध्ये जिंकल्या होत्या. आता आम्हाला २०२४ मध्ये ५० टक्के जागा जिंकायच्या आहेत ज्या २०१९ मध्ये गमावल्या होत्या.

भाजपने २०२४ मध्ये ३५० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी पक्षाने २० महिने आधीच तयारी सुरू केली आहे. यावेळी भाजपने १४४ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले असून त्यात त्यांना अल्प फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले होते. या १४४ जागांपैकी किमान निम्म्या म्हणजे जवळपास ७० जागा काबीज करण्याची भाजपची रणनीती आहे. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने एकट्याने ३०३ जागा जिंकल्या होत्या. गेल्या अनेक दशकांत एका पक्षाने स्वबळावर बहुमत मिळवण्याची ही पहिलीच वेळ होती.

गेल्या वेळी पराभूत झालेल्या १४४ जागांवर भाजपने केंद्रीय मंत्र्यांना जबाबदारी दिली आहे. तसेच, तेथे विजयाचे लक्ष्य दिले आहे. या मंत्र्यांना कल्याणकारी योजनांच्या स्थितीची माहिती घेण्यास सांगण्यात आले आहे. सरल पोर्टलवर ही माहिती अपडेट करावी लागेल. मंत्र्यांना नेमून दिलेल्या भागात वारंवार भेटी देण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय त्यांना सरकार आणि संस्थेच्या कामाच्या वेळा निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. बैठकीत विजयाचा फॉर्म्युला देताना अमित शाह म्हणाले की, मजबूत संघटना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा २०२४ मध्ये मोठा विजय मिळवू शकतो. कुठल्याही प्रकारची हलगर्जी यापुढे खपवून घेतली जाणार नाही. त्यामुळे सर्वांनी जबाबदारी दिलेल्या लोकसभा मतदारसंघात जावे आणि प्रभावी काम करावे, असे निर्देशही शहा यांनी दिले आहेत.

Politics BJP Amit Shah and J P Nadda Union Ministers
Mission 2024 Loksabha Election

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याची ही आहे स्थिती

Next Post

अॅपलने लॉन्च केले iPhone 14 सिरीजचे स्मार्टफोन्स; जाणून घ्या त्यांची वैशिष्ट्ये आणि किंमत

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Screenshot 20250915 070634 Facebook
संमिश्र वार्ता

मविप्रच्या वार्षिक सभेच्या व्यासपीठावर गँग्स ऑफ वासेपुर…सरचिटणीसांनी पोस्ट केला हा फोटो

सप्टेंबर 15, 2025
G008bSZXIAAjtvu
मुख्य बातमी

क्रीकेटच्या मैदानात सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानचा धुव्वा…हस्तांदोलन टाळलं, श्रध्दांजली अर्पण केली

सप्टेंबर 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १५ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 14, 2025
Untitled 18
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत २८ कंटेनरमध्ये असलेला ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त; दोघांना अटक

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रात नाफेडकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री…नाफेडने दिले हे स्पष्टीकरण

सप्टेंबर 14, 2025
rain1
संमिश्र वार्ता

नाशिकसह या जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता

सप्टेंबर 14, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

नाशिक रोड रेल्वे स्थानकातील होल्डिंग एरियाच्या कामांना मंजुरी…गर्दी व्यवस्थापनात होणार फायदा

सप्टेंबर 14, 2025
Screenshot 20250914 163749 Collage Maker GridArt
इतर

मविप्रच्या वार्षिक सभेत खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा (बघा व्हिडिओ)

सप्टेंबर 14, 2025
Next Post
FcErRZ2aIAIdhlL e1662626025500

अॅपलने लॉन्च केले iPhone 14 सिरीजचे स्मार्टफोन्स; जाणून घ्या त्यांची वैशिष्ट्ये आणि किंमत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011