शनिवार, मे 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुख्य आरोपी पाठोपाठ निलंबित पोलिस अधिकाऱ्याचीही हत्या… त्या प्रकरणाला वेगळे वळण… कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार…

by India Darpan
ऑगस्ट 5, 2023 | 5:41 am
in राष्ट्रीय
0
crime diary 2


कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या महाराष्ट्रात गुन्हेगारीचे प्रकार वाढले आहेत, अगदी पोलीस अधिकारी देखील सुरक्षित नाहीत, असे एका घटनेवरून दिसून येत आहे. सांगोला तालुक्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जेवण झाल्यावर रात्री बाराच्या सुमारास शेताबाहेर रस्त्यावर ते शतपावलीसाठी गेले, असताना दबा धरुन बसलेल्या मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने त्यांची हत्या केली. याने हत्येमागे पोलीस खात्यात काम केल्याने गुन्हेगारांकडून असलेले वैर, स्थानिक वाद या सर्व बाबींचा पोलीस कसून तपास करत आहेत. या निर्घृण हत्येमुळे सांगोला परिसरात खळबळ उडाली आहे. वासूद येथे ही धक्कादायक घटना घडली.

पोलिसाला केले बडतर्फ
सांगोला तालुक्यातील वासुद येथील रहिवासी सूरज विष्णू चंदनशिवे हे सहाय्यक पोलीस निरीक्षक होते. २०१८ मध्ये झालेल्या वारणानगर इथल्या नऊ कोटी रुपये चोरी प्रकरणातील संशयित आरोपी सूरज चंदनशिवेवर गुन्हा दाखल होऊन त्यांचे निलंबनही झाले होते. वर्षभरापूर्वी निलंबन मागे घेऊन सध्या ते सांगली पोलीस मुख्यालयात कंट्रोल विभागात कार्यरत होते. मात्र पुन्हा दोन महिन्यांपूर्वी सूरज चंदनशिवे यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले होते. चंदनशिवे हे सध्या गावाकडे शेतात राहायला गेले होते. रोज जेवण झाल्यावर रात्री उशिरा त्यांना शतपावली करायची सवय होती. त्याचपद्धतीने काल रात्री ते जेवण झाल्यावर वासूद केदारवाडी रोडवर शतपावली करत होते. मात्र त्याच वेळी दबा धरुन बसलेल्या मारेकऱ्यांनी त्यांची निर्घृण हत्या केली.

शेतात आढळला मृतदेह
शतपावली करायला गेलेले चंदनशिवे रात्री उशिरापर्यंत घरी आले नाही याची घरच्यांना मोठी काळजी वाटू लागली, त्यामुळे कुटुंबियांनी शोध सुरु केला असता, त्यानंतर पहाटेच्या सुमारास फिरायला आलेल्या काही जणांना सूरज यांचा मृतदेह शेतात दिसला. यानंतर सांगोला पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांची टीम घटनास्थळी पोहोचल्यावर चंदनशिवे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच सोलापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. आता पोलीस त्यांच्या हत्येचा तपास करत आहेत. सूरज यांची हत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली हे अद्याप उघड होऊ शकली नाही.

Police Officer Murder Kolhapur Crime API

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शाळेच्या पेपरमध्ये विद्यार्थ्याने लिहिले ‘जय श्रीराम’… शिक्षकाने हटकले… पुढं हे सगळं घडलं…

Next Post

मणिपूरमधील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल कसा झाला… तपासात समोर आली ही खळबळजनक बाब…

Next Post
Manipur

मणिपूरमधील 'तो' व्हिडिओ व्हायरल कसा झाला... तपासात समोर आली ही खळबळजनक बाब...

ताज्या बातम्या

nagpur1 1024x696 1

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार…. महसूल मंत्र्यांनी दिले निर्देश

मे 17, 2025
Untitled 32

ईडीची मोठी कारवाई…..या बांधकाम घोटाळयात ९ कोटीची कॅश, २३ कोटीचे दागिने व गुन्हेगारी कागदपत्रे जप्त

मे 17, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

मे 17, 2025
Maharashtra Police e1705145635707

राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना प्रमोशन…नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनाही पदोन्नती

मे 17, 2025
IMG 20250516 WA0348

वसंत व्याख्यान माला….ओबीसी आरक्षणाची लढाई अद्याप संपलेली नाही…माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

मे 17, 2025
WhatsApp Image 2025 05 16 at 7.43.46 PM 1024x682 1

वानखेडे मैदान येथील स्टॅन्डचा नामकरण सोहळा, रोहित शर्मासह यांची स्टॅण्डला नावे

मे 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011