इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
२०२५ च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील क्षणचित्रे सामाईक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे भारताच्या विविधतेतील एकतेचे जिवंत दर्शन असल्याचे म्हटले आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले की, या भव्य संचलनातून सांस्कृतिक वारसा आणि लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडले. एक्स या समाजमाध्यमावरील वेगळ्या पोस्टमध्ये मोदी म्हणालेः
२०२५ च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची क्षणचित्रेः
भारताच्या विविधतेतील एकतेचे चैतन्यमय दर्शन. भव्य संचलनामध्ये सांस्कृतिक वारसा आणि लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडले. आपल्या राज्यांच्या समृद्ध परंपरांचे प्रतिनिधित्व करणारे आकर्षक चित्ररथ “कर्तव्य पथावरील ही सकाळ खरोखरच संस्मरणीय होती. ही आणखी काही क्षणचित्रे …