रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मेघालय आणि त्रिपुरा दौऱ्यावर; या प्रकल्पांचे करणार उदघाटन

डिसेंबर 18, 2022 | 12:08 pm
in राष्ट्रीय
0
pm narendra modi

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज, (रविवार, १८ डिसेंबर) मेघालय आणि त्रिपुराला भेट देणार आहेत. शिलाँगमध्ये ‘नॉर्थ ईस्टर्न कौन्सिल’च्या (ईशान्य परिषद) सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात पंतप्रधान सहभागी होणार आहेत. सकाळी सुमारे 10:30 वाजता राज्य कन्व्हेन्शन सेंटर, शिलाँग येथे कौन्सिलच्या बैठकीला पंतप्रधान उपस्थित राहतील. त्यानंतर सुमारे 11:30 वाजता शिलाँगमध्ये एका जाहीर कार्यक्रमात ते अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील. त्यानंतर ते आगरतळा येथे प्रस्थान करतील आणि दुपारी सुमारे 2:45 वाजता एका जाहीर कार्यक्रमात विविध महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

मेघालय दौरा
पंतप्रधान ‘नॉर्थ ईस्टर्न कौन्सिल’च्या (एनईसी) बैठकीला उपस्थित राहतील आणि संबोधित करतील. या परिषदेचे 7 नोव्हेंबर,1972 रोजी औपचारिक उद्घाटन झाले होते. एनईसीने ईशान्येकडील प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना आणि या प्रदेशातील सर्व राज्यांमधील इतर विकास उपक्रमांना पाठिंबा दिला आहे. एनईसीने विशेषतः शिक्षण, आरोग्य, क्रीडा, जलसंपदा, कृषी, पर्यटन, उद्योग, यासह अन्य महत्वाच्या क्षेत्रांमधील त्रुटी भरून काढण्यासाठी भांडवली आणि सामाजिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये मोलाचे सहाय्य केले आहे. यावेळी होणार्‍या जाहीर कार्यक्रमात, पंतप्रधान 2450 कोटीहून अधिक किमतीच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. उमसावली येथे ते आयआयएम शिलाँगच्या नवीन आवाराचे उद्घाटन करतील.

या प्रदेशातील दूरसंचार कनेक्टिव्हिटीला (संपर्क सक्षमता) आणखी चालना देण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून, पंतप्रधान 4जी मोबाइल टॉवरचे लोकार्पण करतील, त्यापैकी 320 हून अधिक पूर्ण झाले आहेत, तर सुमारे 890 टॉवरच्या उभारणीचे काम सुरु आहे. ते शिलॉन्ग – डिएन्गपासोह मार्गाचे उद्घाटन करतील, यामुळे नवीन शिलाँग सॅटेलाइट टाउनशिपचा संपर्क सुधारेल आणि शिलॉन्ग मधील वाहतूक कोंडी कमी होईल. पंतप्रधान, मेघालय, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशमधील अन्य चार महामार्ग प्रकल्पांचे देखील उद्घाटन करतील. ते मेघालय येथील मशरूम डेव्हलपमेंट सेंटर मधील स्पॉन प्रयोगशाळेचे उद्घाटन करतील, ज्यामुळे मशरूमचे उत्पादन वाढेल आणि शेतकरी आणि उद्योजकांना कौशल्य प्रशिक्षणही मिळेल. क्षमता विकास आणि तंत्रज्ञानाचे अद्यायावतीकरण याद्वारे मधमाशीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे, यासाठी मेघालयमध्ये स्थापन करण्यात आलेल्या एकात्मिक मधमाशीपालन विकास केंद्राचे पंतप्रधान उद्घाटन करतील. याशिवाय, ते मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा आणि आसाममधील 21 हिंदी ग्रंथालयांचे उद्घाटन करतील.

आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमधील सहा रस्ते प्रकल्पांची पंतप्रधान पायाभरणी करतील. ते तुरा आणि शिलाँग तंत्रज्ञान उद्यान फेज-II येथे इंटिग्रेटेड हॉस्पिटॅलिटी आणि कन्व्हेन्शन सेंटरची पायाभरणीही करतील. तंत्रज्ञान उद्यान फेज-II जवळजवळ 1.5 लाख चौरस फुट क्षेत्रावर बांधण्यात आले आहे. ते व्यावसायिकांसाठी नवीन संधी उपलब्ध करेल आणि 3000 हून अधिक रोजगाराची निर्मिती करेल, अशी अपेक्षा आहे. इंटिग्रेटेड हॉस्पिटॅलिटी आणि कन्व्हेन्शन सेंटरमध्ये संमेलन केंद्र, अतिथी कक्ष, फूड कोर्ट इत्यादी सुविधा उपलब्ध असतील. ते पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि प्रदेशातील सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा प्रदान करेल.

त्रिपुरा दौरा
पंतप्रधान 4350 कोटी पेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रमुख उपक्रमांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करतील. प्रत्येकाकडे स्वतःचे घर असावे, हे सुनिश्चित करण्यावर पंतप्रधानांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या प्रदेशात हे सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून, पंतप्रधान प्रधानमंत्री आवास योजना– शहरी आणि प्रधानमंत्री आवास योजना– ग्रामीण अंतर्गत लाभार्थ्यांसाठी गृह प्रवेश कार्यक्रमाचा शुभारंभ करतील. 3400 कोटींहून अधिक खर्च करून बांधण्यात आलेल्या या घरांचे 2 लाखांहून अधिक लाभार्थी आहेत. रस्ते जोडणीवर विशेष लक्ष केंद्रित करत हाती घेण्यात आलेल्या आगरतळा बायपास (खैरपूर-आमतली) एनएच-08 च्या रुंदीकरणाच्या प्रकल्पाचे पंतप्रधान उद्घाटन करतील. यामुळे आगरतळा शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत होईल. पंतप्रधान, ते पीएमजीएसवाय III (प्रधानमंत्री ग्राम सडक योजना) अंतर्गत 230 किमी पेक्षा जास्त लांबीच्या 32 रस्त्यांची आणि 540 किमी पेक्षा जास्त लांबीच्या 112 रस्त्यांच्या सुधारणा कामाची पायाभरणी देखील करतील. आनंदनगर येथील स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि आगरतळा शासकीय दंत महाविद्यालयाचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत.

https://twitter.com/narendramodi/status/1604156698830458881?s=20&t=75iBSP3NCUjtpJW2XyD49A

PM Narendra Modi Todya Meghalaya Tripura Tour Today

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मालेगाव पोलिसांनी जप्त केला सव्वा दोन लाखाचा गुटखा

Next Post

आता आले अनोखे एअर फिल्टर! हवेतून होणारे संक्रमण रोखणार, भारतीय शास्त्रज्ञांच्या संशोधनाला यश

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
image002EZXP

आता आले अनोखे एअर फिल्टर! हवेतून होणारे संक्रमण रोखणार, भारतीय शास्त्रज्ञांच्या संशोधनाला यश

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011