इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी २९ हजार कोटींची भेट घेऊन आपल्या गृहराज्यात पोहोचलेल्या पंतप्रधानांनी शुक्रवारी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आणि अहमदाबाद मेट्रोची सफरही केली. यादरम्यान पीएम मोदींची संवेदनशीलताही दिसून आली.
अहमदाबादहून गांधीनगरला जाताना पंतप्रधानांना रस्त्यात रुग्णवाहिका दिसली. तेव्हा त्यांनी तात्काळ त्यांचा ताफा थांबवला. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी त्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, ” हे लोकांचे सरकार आहे. गांधीनगरहून अहमदाबादला जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा रुग्णवाहिकेला रस्ता देण्यासाठी थांबला.
तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी गुजरातमधील गांधीनगर ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनच्या नवीन अपग्रेड आवृत्तीला हिरवा झेंडा दाखवला आणि त्यानंतर त्यांनी ट्रेनमध्ये चढून गांधीनगर ते अहमदाबादमधील कालुपूर स्टेशनपर्यंत प्रवास केला. सकाळी १०.३० वाजता गांधीनगर रेल्वे स्थानकावरून मोदींनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) एका निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधानांनी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या डब्यांची पाहणी केली आणि त्यात उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. ट्रेनच्या लोकोमोटिव्ह इंजिनच्या कंट्रोल सेंटरचीही त्यांनी पाहणी केली.
https://twitter.com/sanghaviharsh/status/1575760898446135296?s=20&t=BKMexj6J7swuSL47t43UVQ
PM Narendra Modi Stop Convoy for This Reason Video