इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती म्हणजेच एकता दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील केवडिया येथे पोहोचले आहेत. आज त्यांनी ‘लोहपुरुष’ यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्याचवेळी भाषण करताना मोरबी पूल दुर्घटनेबद्दल ते भावूक झाले. त्यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले तसेच सध्या सुरू असलेल्या बचाव कार्याची आणि सरकारच्या प्रयत्नांची माहिती दिली.
पंतप्रधान म्हणाले की, ‘मी एकता नगरमध्ये आहे, माझे हृदय मोरबीतील पीडितांशी जोडले गेले आहे. अशी वेदना मी माझ्या आयुष्यात क्वचितच अनुभवली आहे. एका बाजूला करुणेने भरलेले दुःखी अंतःकरण आणि दुसरीकडे कर्तव्याचा मार्ग. ज्यांनी आपला जीव गमावला आहे त्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो.
मोरबीमध्ये ‘झुलतो पुल’ या नावाने प्रसिद्ध असलेला झुलता पूल रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कोसळला. अपघाताच्या वेळी पुलावर सुमारे ५०० लोक होते असे वृत्त आहे. आतापर्यंत १७७ जणांची सुटका करण्यात आली आहे. पुल दुर्घटनेत १३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिली आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1586729348748410880?s=20&t=PqdKtoWMWX3ww9sqFyy-XA
मोदी म्हणाले की, मदत कार्यात कोणतीही कमतरता नाही. सरकार प्रत्येक प्रकारे पीडित कुटुंबांच्या पाठीशी आहे. गुजरात सरकार काल संध्याकाळपासून मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे. केंद्र सरकारकडून गुजरात सरकारला सर्वतोपरी मदत केली जात आहे. एनडीआरएफ आणि लष्कर तैनात आहे. संघवी यांनी असेही सांगितले होते की, ‘नौदल, एनडीआरएफ, वायुसेना आणि लष्कर वेगाने पोहोचले, २०० हून अधिक लोकांनी रात्रभर (शोध आणि बचाव कार्यासाठी) काम केले.’
भारतीय लष्कराचे मेजर गौरव म्हणाले की, ‘बचाव कार्य सुरू आहे. भारतीय लष्कर रात्री तीनच्या सुमारास येथे पोहोचले होते. आम्ही मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत. एनडीआरएफचे पथकही बचावकार्य करत आहेत. येथे बचावकार्यात गुंतलेल्या सैनिकांनाही आव्हानांचा सामना करावा लागत आहे. एनडीआरएफ कमांडंट व्हीव्हीएन प्रसन्न कुमार गढूळ पाण्यामुळे पाण्याखाली शोध घेत असताना दृश्यमानतेची समस्या आहे. झुला पडल्यामुळे तेथे काही लोक गाडले गेल्याची शक्यता असून, त्याचा ढिगारा हटवल्यानंतर तेथेही शोध घेऊ.
भारताचे लोहपुरुष सरदार पटेल यांच्या नेतृत्वाचे मोदींनी स्मरण केले. भारताकडे सरदार पटेल यांच्यासारखे नेतृत्व नसते तर काय झाले असते? ५५० हून अधिक संस्थानं एकत्र झाली नसती तर काय झालं असतं? जर आपल्या बहुतेक राजांनी संन्यासाचा कळस दाखवला नसता तर आज आपण जो भारत पाहतोय त्याची कल्पनाही करता आली नसती. सरदार पटेलांनीच हे काम सिद्ध केले आहे, असेही ते म्हणाले.
https://twitter.com/narendramodi/status/1586930459589500928?s=20&t=PqdKtoWMWX3ww9sqFyy-XA
PM Narendra Modi on Gujrat Morbi Accident