इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी एका सर्वोच्च जागतिक सन्मानाने गौरविण्यात आले आहे. जगात केवळ मोजक्याच व्यक्तींना हा सन्मान मिळाला आहे. या सन्मानामुळे जगभरात भारताची वाहवा केली जात आहे.
जपानमधील G-7 आणि क्वाड बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले. येथे त्यांनी फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक आयलँड्स को-ऑपरेशन (FIPIC) च्या तिसऱ्या शिखर परिषदेला हजेरी लावली. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी पॅसिफिक क्षेत्रातील अनेक देशांच्या नेत्यांची भेट घेऊन मैत्रीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. जागतिक नेता म्हणून भारताच्या या पावलांसाठी पापुआ न्यू गिनी आणि फिजीच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या देशाचा सर्वोच्च सन्मान – ‘कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ प्रदान केला. जगात फक्त काही गैर-फिजीयनांना हा सन्मान मिळाला आहे. हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांनी आपल्या देशवासियांना अर्पण केला असून तो त्यांचा सन्मान असल्याचे म्हटले आहे.
https://twitter.com/PMOIndia/status/1660514407024312320?s=20
पॅसिफिक बेट राष्ट्रांची एकता आणि ग्लोबल साउथच्या नेतृत्वासाठी पापुआ न्यू गिनीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू’ देऊन सन्मानित केले. पापुआ न्यू गिनीतील फार कमी अनिवासींना हा पुरस्कार मिळाला आहे. दुसरीकडे, पॅसिफिक बेट देश प्रजासत्ताक पलाऊचे अध्यक्ष सुरंगेल एस. व्हीप्स ज्युनियर यांनी पंतप्रधान मोदींना अबकाल पुरस्काराने सन्मानित केले. दोन्ही नेत्यांची ही भेट फिपिक शिखर परिषदेच्या बाजूला झाली.
विशेष म्हणजे, रविवारी पंतप्रधान मोदी प्रथम APEC हाऊसमध्ये पोहोचले, जेथे त्यांचे पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी स्वागत केले. त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी गव्हर्नर जनरल सर बॉब डेड यांचीही भेट घेतली. यादरम्यान, दोन्ही नेत्यांनी भारत-पापुआ न्यू गिनी संबंधांमधील विकास भागीदारीचे महत्त्व अधोरेखित केले.
https://twitter.com/BharwalKamlesh/status/1660548575292702720?s=20
PM Narendra Modi has been conferred the highest honour of Fiji