नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दोन्ही टप्प्याचं मतदान नुकतंच पूर्ण झालं आहे. आता ८ डिसेंबर रोजी निवडणूकीचा निकाल लागणार असून, त्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. याच दिवशी गुजरातमध्ये यंदा कुणाची सत्ता येणार याचं चित्र स्पष्ट होईल. दरम्यान, मतदानासाठी जाताना मोदींनी रोड शो केल्याची तक्रार निवडणूक आयोगाला प्राप्त झाली होती. आता निवडणूक आयोगानंही याप्रकरणी मोदींविरोधातील तक्रार दाखल करुन घेतली आहे.
गुजरातमध्ये शेवटच्या टप्प्यासाठी सोमवारी एकूण ९३ मतदार संघांसाठी मतदान पार पडलं. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अहमदाबादच्या रानिप येथील निशान शाळेतील मतदान केंद्रावर उपस्थिती लावत मतदानचा हक्क बजावला. यावेळी रोड शो केल्याची तक्रार गुजरात काँग्रेसच्या लॉ सेलचे अध्यक्ष योगेश रवाणी यांनी याबाबत तक्रार केली होती. रोड शो दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचा झेंडा घेऊन भगवा स्कार्फ धारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मतदान करण्यासाठी जात असताना ते राणीप येथील मतदान केंद्रापासून ५००-६०० मीटर अंतरावर मोदी कारमधून खाली उतरले आणि आजूबाजूला जमलेल्या लोकांसोबत चालत गेले. हा आचारसंहितेचा भंग असल्याचा काँग्रेसचा आरोप करण्यात आला आहे
https://twitter.com/blsanthosh/status/1599633271830491136?s=20&t=_2duIvGV9jIB-L-qAEkDWw
PM Narendra Modi Election Commission Complaint