इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी पंतप्रधान अल्बानीज यांनी कोणतीही कसर सोडली नाही. सिडनीतील कुडोस बँक एरिना येथे पंतप्रधान मोदींचे आगमन होताच पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. दरम्यान, सर्वत्र चर्चा असलेल्या पारंपरिक ‘स्मोकिंग सेरेमनी’ने पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यात आले.
असा आहे स्मोकिंग सेरेमनी
ऑस्ट्रेलियातील कोणत्याही महत्त्वाच्या किंवा शुभ कार्यक्रमाची सुरुवात स्मोकिंग सेरेमनीने केली जाते, जी येथील परंपरागत प्रथा आहे. या प्रथेमध्ये, स्थानिक वनस्पतींची पाने (औषधी) जाळल्या जातात. या औषधी धुराने आध्यात्मिक आणि शारीरिक शुद्धी होते, अशी श्रद्धा आहे. असे मानले जाते की स्मोकिंग सेरेमनी वाईट आत्म्यांना दूर ठेवू शकतो. पूर्वी बाळाच्या जन्माच्या वेळी किंवा दीक्षा, धार्मिक कार्यक्रम केले जायचे. आता परदेशी पाहुण्यांच्या स्वागतादरम्यान स्मोकिंग सेरेमनी देखील केले जातात. हा सोहळा अनेकदा आदिवासी समाजातील सदस्य करतात.
भारत तरुण प्रतिभांचा कारखाना
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतात क्षमतेची किंवा संसाधनांची कमतरता नाही. आज जगातील सर्वात मोठी आणि तरुण टॅलेंट फॅक्टरी भारतात आहे. तुम्ही सर्वांनीही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला हे जाणून मला आनंद झाला. आमच्या क्रिकेटच्या नात्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. क्रिकेटच्या मैदानावरील स्पर्धा जितकी रंजक आहे, तितकीच आमची मैदानाबाहेरची मैत्री अधिक घट्ट आहे. गेल्या वर्षी महान क्रिकेटपटू शेन वॉर्नचे निधन झाले तेव्हा ऑस्ट्रेलियासह लाखो भारतीयांनी शोक व्यक्त केला. जणू आपण कोणीतरी गमावलं होतं.
पंतप्रधान अल्बानीज म्हणाले की, आज पंतप्रधान मोदी यांचे हे असे भव्य स्वागत होताना पाहून मी थक्क झालो आहे. क्वचितच कुणा नेत्याला असे भाग्य लाभले असेल. पंतप्रधान मोदी हे खरे बॉस आहेत.
नरेंद्र मोदींचं ऑस्ट्रेलियात असं झालं स्वागत…#NarendraModi #Australia pic.twitter.com/TDQURToAzm
— BBC News Marathi (@bbcnewsmarathi) May 23, 2023
PM narendra modi australia welcome Smoking Ceremony