India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

एसटी प्रवाशांनो, तुम्हाला आहेत एवढे सारे अधिकार आणि हक्क… तातडीने जाणून घ्या…

India Darpan by India Darpan
May 23, 2023
in विशेष लेख
0

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– जागो ग्राहक जागो –
एसटी प्रवासी, अधिकार आणि हक्क

एसटीची सेवा ही राज्याची जिवनवाहिनी सजमली जाते. दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, या प्रवाशांना कुठले आणि अधिकार प्राप्त आहेत, हे अनेकांना ठाऊक नाही. एस टी प्रवाशांनो, सजग व्हा, सतर्क व्हा, आपल्याला मिळणाऱ्या सुविधा मिळत नसतील तर कशा मिळवायच्या ते पहा!

विजय सागर
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य,
(अखिल भारतीय ग्राहक पंचायत) मो. 9422502315

महाराष्ट्रात बऱ्या पैकी सर्व एस टी अगारात सुलभ शौचालय आहे. सदर शौचालय स्वच्छ राहावे त्यात पाणी मिळावे, त्याची देखभाल व्हावी म्हणून सरकारने सदर सौचालाये ही सुलभ इंटरनॅशन किंवा इतर लोकांना चालवणे साठी दिली आहेत. एस टी स्टँड वरील सदर टॉयलेट स्वच्छ ठेवणे त्यात दिवा बत्ती असणे, लाईट बिल देणे, त्यात पाणी पुरवठा करून लोकांना सुविधा देणे यासाठी त्यांच्याशी एस टी आगर हे करारनामा करतात.

शिवाय ग्राहक हा प्रत्येक वेळी सदर सेवा पैसे देऊन विकत घेतो. तेव्हा ग्राहकाचे काही हक्क आणि अधिकार आहेत हे ग्राहक विसरतो. एस टी स्टँड वरील टॉयलेट मध्ये लाईट नाही, पाणी नाही किंवा तेथे स्वच्छ्ता नाही असे आढळले तर योग्य ठिकाणी दाद मागितली पाहिजे. परंतु ग्राहक हा मुकाट्याने सदर ठिकाणी सौचालात वापरतो, ते स्वच्छ नसेल तर वापरत नाही. त्यात महिलांना याचा खूप त्रास होतो. कारण महिलांना टॉयलेट वापरणे साठी मिळाले नाही तर त्यांना खूप त्रास होऊ शकतो.

वेळेवर टॉयलेट ला गेले नाही तर मूत्र विकार होतात, त्याचा परिणाम म्हणून इतर आजार जडतात. युरिन इन्फेक्शन मुळे कित्येक महिलांना, पुरुषांना खूप त्रास होतो. सदर इन्फेक्शन हे अस्वच्छ टॉयलेट मुळे होते.

केंद्र सरकारने तसेच राज्य सरकारने याबाबत खूप चांगले धोरण अवलंबले आहे. त्यासाठी काही मोबदला घेऊन सुलभ इंटरनॅशन किंवा तत्सम कंपनी कडे ही टॉयलेट्स देखभाल करणे साठी करारनामा करून दिलेली आहेत. तसेच सदर काम योग्य रीतीने होते आहे की नाही याची पाहणी करणे आणि त्यावर अंमलबजावणी करणे साठी कंट्रोलर, अगार प्रमुख यांना अधिकार दिलेले आहेत. परंतु सदर अधिकारी, कर्मचारी वर्ग हा उदासीन असतो आणि त्यांना स्वतःला त्यात जावे लागत नाही म्हणून ते बेफिकीर असतात, जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष करतात त्याची अजून काही वेगळी कारणे असू शकतात. परंतु ग्राहक म्हणून आपण सतर्क राहिलो तर नक्कीच आपण ही परिस्थिती, वस्तुस्थिती बदलू शकतो. नुकतेच इस्लामपूर, सांगली येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे सांगली जिल्हा टीम ने व्यवस्थापक, सुलभ शौचालय इस्लामपूर यांना तसेच नाथजल या जादा दराने पाणी विक्री करणाऱ्या ना दंड करणे साठी एस टी महामंडळ यांना भाग पाडले आहे. तेव्हा तुम्ही पण गप्प बसू नका.

रा.प.म. आगार इस्लामपूर जिल्हा सांगली, येथे प्रवासी ग्राहकांची आर्थिक लूट सुरू होती. याबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायत सांगली जिल्हा यांनी, श्री अक्षय पाटील, जिल्हा प्रवासी समिती प्रमुख, यांचे सोबत सर्व्हे करून आगार व्यवस्थापक, यांच्याकडे ऑनलाईन तक्रार दिली होती ती अशी:
इस्लामपूर आगार या ठिकाणी भेट दिली असता आपल्या आगारामध्ये टॉयलेट सुविधेचा दर नियमानुसार दोन रुपये आहे व इस्लामपूर आगारांमध्ये दहा रुपये घेत आहेत. याचे सर्व स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओ तयार करून जोडले. तसेच या ठिकाणी असणारे नाथ जल पिण्याचे पाणी एक लिटर बाटली MRP 15 आहे व येथील सर्व ठिकाणी वीस रुपये घेत आहेत पावती मागितली असता पावती देत नाहीत.

आगारांमध्ये पोलीस कॉन्स्टेबल स्टिंग ऑपरेशन केलं त्यावेळेस उपलब्ध नव्हते या सर्व प्रकाराची नोंद एस ती आगारातील तक्रार पुस्तकांमध्ये केली आहे. तरी या सर्वांची दखल घेऊन संबंधित ठेकेदारांच्यावर योग्य ती कारवाई करावी असे कळवले होते.
तसेच 1 लिटर पाणी व अर्धा लिटर पाणी याचे 30 रुपये बिल घेतले आहे यांनी बिल पावती दिली नाही म्हणून ऑनलाइन बिल पे केले आणि त्याची प्रिंट तक्रारी सोबत जोडली. यासाठी श्री अक्षय पाटील, सांगली जिल्हा प्रवासी समिती प्रमुख, येडेनिपाणी, तालुकावाळवा, जिल्हा सांगली (Mo 9730221765.) यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि ईमेल द्वारे तक्रार दाखल केली.

त्यावर सांगली विभाग कंट्रोलर, एम एस आर टी सी यांनी तात्काळ कारवाई करून सुलभ सौचालय यांना ५०० रुपये दंड आकारला. नाथजल विक्री करणाऱ्याला योग्य सूचना करून पिण्याच्या एक लिटर पाण्याची बाटली १५ रुपये आणि अर्धा लिटर पाण्याची बाटली ९ रुपये या एम आर पी दराने विक्री करणेसाठी आदेश दिले. अखिल भारतीय ग्राहक पंचायत ने इथेच न थांबता वजन माप अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे आणि सदर जास्त दराने पाणी बॉटल विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करणे साठी तक्रार करणेचे ठरवले आहे.

तेव्हा एस टी ग्राहक राजा जागा हो. सुविधा मिळत नसतील तर तक्रार कर, पुरावा म्हणून स्वतःच्या हातातील स्मार्ट फोन चा वापर कर, फेसबुक लाईव्ह, व्हिडिओ रेकॉर्डिंग इत्यादी करून त्याच फोन ने संबंधित लोकांना ईमेल करून अधिकार मिळव.
चला तर मग आपण आता स्वतःच सर्व गोष्टी करूयात आणि महाराष्ट्रातील एस टी स्टँड सुधारू यात. टॉयलेट स्वच्छ ठेवणे आणि योग्य पैसे आकारणे, एस टी स्टँड तसेच इतरत्र मिळणाऱ्या पाण्याच्या बाटल्या, कॉल्ड ड्रिंक्स, दूध एमआरपी पेक्षा जास्त पैसे देऊन विकत घेणार नाही आणि कोणी विकलेच तर त्याला धडा शिकवू यात.

एका सजग ग्राहकाने नाशिक रोड येथील एस टी स्टँड वर नाथ जलची विक्री एम आर पी पेक्षा जास्त दराने केली आणि ग्राहकांशी असभ्य वागले याचा व्हिडिओ सोशल मीडिया वर टाकला त्यामुळे एस टी महामंडळाने सदर नाशिक रोड स्टँड वरील नाथजल ला नोटीस देऊन ५०००० रुपये दंड केला आहे. तेव्हा ग्राहक राजा जागा हो.

एसटी महामंडळाच्या खालील इमेल वर आपण तक्रार करु शकता
१) [email protected]
२)[email protected]
३)[email protected]
वजन माप अधिकारी यांच्याकडे तक्रार करणे साठी खालील लिंक वापरा.
https://www.vaidhmapan.maharashtra.gov.in/LMD/Complaint/ComplainEntry.aspx?ComplaintType=ComplaintRegistration?

याशिवाय आपणास काही माहिती हवी असेल तर आपण प्रत्यक्ष तक्रार करणारे श्री अक्षय पाटील यांच्याशी किंवा खालील अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे कार्यकर्ते मंडळींशी संपर्क करू शकता.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, ६३४, सदाशिव पेठ, पुणे ३०
आमची वेबसाईट : www.abgpindia.com
मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा: *दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०*

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
विजय सागर 9422502315
श्री विलास लेले 9823132172
सौ अंजली देशमुख 9823135803
श्रीमती विजया वाघ 9075132920
श्री रवींद्र वाटवे 9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी 7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675

*ठाणे*- श्रीमती स्मिता जामदार 9819438286,
श्री दिपक सावंत 9833398012
*डोंबिवली* श्री राजेंद्र बंडगर 9975712153
,*नागपूर*, श्री विलास ठोसर 7757009977
*कोकण प्रांत* सौ वेदा प्रभूदेसाई 9075674971

*देवगिरी परभणी* श्री विलास मोरे 09881587087
*कोल्हापूर* ऍड.सुप्रिया दळवी, मो.7038887979
*सांगली* श्री.सर्जेराव सूर्यवंशी,मो.9763722243
*सातारा* श्री जयदीप ठुसे, 9767666346
*सोलापूर* श्री.शशिकांत हरिदास, मो.9423536395

*जळगांव* डॉ. अनिल देशमुख, मो.7588011327
*नगर*श्री. अतुल कुऱ्हाडे, मो.9420642021
*नाशिक*श्री. तुळशीराम सांळुके, मो. 9422259089
श्री. रविंद्र अमृतकर, मो. 8412995454
*धुळे* श्री. हरीश जाधव, मो. 7798439555
*नंदुरबार* श्रीम.वदंना तोरवणे, मो .9156972786

MSRTC ST Bus Passengers Rights by Vijay Sagar


Previous Post

पंतप्रधान मोदींचे ऑस्ट्रेलियात अनोख्या पद्धतीने स्वागत… काय आहे स्मोकिंग सेरेमनी… (Video)

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – प्रियकर आणि प्रेयसी

Next Post

इंडिया दर्पण - हास्य षटकार - प्रियकर आणि प्रेयसी

ताज्या बातम्या

मालेगावमध्ये पोलिस शिपाई एसीबीच्या जाळ्यात; यासाठी मागितले ४ हजार

June 6, 2023

अमृता फडणवीस पुन्हा एकदा ट्रोल; आता हे आहे कारण…

June 6, 2023

आज विरोधक सक्रीय होतील; जाणून घ्या बुधवार, ७ जून २०२३चे राशिभविष्य

June 6, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – ७ जून २०२३

June 6, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – लायब्ररी

June 6, 2023

अतिखोल अरबी समुद्रातील अति तीव्र चक्रीवादळ… महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

June 6, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group