नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घोषणा केली की, तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथे पीएम मित्र मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहेत. या पाच पार्कच्या माध्यमातून (फॉर्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन) भारताच्या कापड व्यवसाय क्षेत्राला चालना देतील. पीएम मित्र मेगा टेक्स्टाईल पार्क्स कापड उद्योग क्षेत्राला आधुनिक पायाभूत सुविधा देतील, त्याचबरोबर कोट्यावधीची गुंतवणूक आणतील आणि लाखो रोजगार निर्माण करतील. असे मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘पीएम मित्र मेगा टेक्स्टाईल पार्क्स, कापड उद्योग क्षेत्राला 5 एफ (फॉर्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन) दृष्टीकोनानुरूप चालना देतील. पीएम मित्र मेगा टेक्स्टाईल पार्क्स तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथे उभारण्यात येतील ही माहिती सामायिक करताना आनंद होत आहे.’ “पीएम मित्र मेगा टेक्स्टाईल पार्क्स कापड उद्योग क्षेत्राला आधुनिक पायाभूत सुविधा पुरवतील, करोडोंची गुंतवणूक आकर्षित करतील आणि लाखो रोजगारांची निर्मिती करतील. हे मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड याचे उत्कृष्ट उदाहरण ठरेल.”
या पार्कच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येणार आहे. तसेच, याठिकाणी प्रचंड मोठा रोजगार निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच, या निर्णयाबद्दल दोघांनीही पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.
https://twitter.com/mieknathshinde/status/1636696958671929345?s=20
PM Narendra Modi Announcement Amaravati 5 Mega Park