इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा इंडिया गेटवर बसविण्यात आला असून त्याचा अनावरण सोहळा सध्या संपन्न होत आहे. संपूर्ण देश नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती आज साजरी करत आहे. इंडिया गेटवर ग्रेनाइटपासून बनलेला त्यांचा भव्य पुतळा बसवला जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, नेताजींच्या भारताच्या ऋणानुबंधाचे प्रतीक हा पुतळा आहे. नेताजींचा भव्य पुतळा साकार होईपर्यंत त्यांचा होलोग्राम पुतळा आता येथे असेल. विशेष म्हणजे इंडिया गेटच्या समोर ज्या छत्राखाली बोस यांचा पुतळा बसविण्यात येत आहे त्याच छत्रीत सन 1960 च्या दशकापर्यंत ब्रिटनचे सम्राट पाचवा जॉर्ज यांचा पुतळा होता. ही छत्री 1936 मध्ये जॉर्ज पंचम यांच्या सन्मानार्थ बांधण्यात आली होती. आता मोदी सरकारने ब्रिटिश राजवटीची चिन्हे बदलण्याची प्रक्रिया पुढे नेत आहे. हा सोहळा सध्या सुरू आहे. बघा खालील व्हिडिओ
https://twitter.com/PIB_India/status/1485235318190383108?s=20