नितीन नायगावकर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
प्लास्टिकचा वापर कमी करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमध्ये अनेक उपक्रम राबविले. पण तरीही प्लास्टिकचा वापर कमी झालेला नाही. मुख्य म्हणजे सरकारच्या निर्णयांमध्येही अनेक विरोधाभास आहेत. कारण एकीकडे साधे पॉलिथीन बंद करण्यासाठी सरकार ज्या तीव्रतेने कारवाई करते, तेवढी तीव्रता प्लास्टिकच्या बॉटलचा वापर थांबविण्यात दिसत नाही. आता हीच प्लास्टिकची बॉटल नागरिकांना विविध आजारांकडे घेऊन जाताना दिसतेय.
प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिल्याने विशेषतः महिलांना एका मोठ्या आजाराचा सामना करावा लागू शकतो, असे संशोधकांनी म्हटले आहे. हा मोठा आजार म्हणजे टाईप टू मधूमेह होय. प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी प्यायल्याने महिलांना हा आजार संभवतो. अर्थात चुकीची जीवनशैली आणि चुकीच्या आहारांमुळे हा धोका हल्ली वाढत चालला आहे. महिला आहाराची चिंता करतील, पण सवयींची चिंता करत नाहीत. त्यामुळेच प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पीणं धोक्याचं ठरत आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांचेच प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिण्याचे प्रमाण जास्त आहे. आणि तेच धोकादायक ठरत आहे. सध्या भारतातील ८ कोटी लोक टाईप २ मधुमेहाच्या विळख्यात आहेत.
ग्लोबल डायबेटिक कम्युनिटीच्या संशोधनानुसार, फॅथलेट्स रसायनांचा महिलांवर खूप परिणाम होतो. Phthalates अंतःस्रावी व्यत्यय आणणारी रसायने आहेत जी अंतःस्रावी ग्रंथींमधून सोडल्या जाणार्या संप्रेरकांमध्ये अडथळा म्हणून काम करतात. या संशोधनात अनेक देशांतील 1300 महिलांचा समावेश करण्यात आला होता. संशोधकांना यामध्ये असं आढळून आले की 30 ते 63 टक्के महिलांना फॅथलेट्स रसायनाच्या संपर्कात आल्याने त्यांना मधुमेहाचा धोका वाढतो. या संशोधनात असेही आढळून आले की phthalates च्या संपर्कात आल्याने कृष्णवर्णीय महिलांवर परिणाम होत नाही.
वापर कमी व्हावा
phthalates हे प्लास्टिकमध्ये आढळणारे रसायन आहे, ज्याच्या संपर्कात आल्याने महिलांमध्ये टाइप 2 मधुमेहाचा धोका अनेक पटींनी वाढतो. महिलांनी पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर केल्यास त्यांना मधुमेहाचा धोका असल्याचा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. Phthalates रसायने अतिशय धोकादायक असतात, जी प्लास्टिकमध्ये आढळतात. त्यामुळे महिलांनी प्लास्टिकच्या बॉटलने पाणी पीणे टाळले पाहिजे, असा निष्कर्श काढण्यात आला आहे.
Plastic Bottle Drinking Water Health Risk Research