इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी आहे. वाकायामा शहरातील भाषणादरम्यान एका व्यक्तीने त्यांच्यावर पाईप बॉम्ब फेकल्याची माहिती आहे. मात्र, बॉम्बचा स्फोट होईपर्यंत पंतप्रधान किशिदा यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. किशिदा यांचे जेथून भाषण होणार होते तेथून नेत असतानाच मोठा आवाज ऐकू आल्याचे वृत्त आहे.
या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंतप्रधान किशिदा यांचे भाषण ऐकण्यासाठी आलेले लोक घटनेनंतर इकडे-तिकडे धावताना दिसत आहेत. यादरम्यान पोलीस एका व्यक्तीला जमिनीवर पाडून नियंत्रित करताना दिसले. या घटनेत पंतप्रधानांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. ते त्यांच्या लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ एका कार्यक्रमात बोलण्यासाठी आले होते.
https://twitter.com/Geeta_Mohan/status/1647073280262836224?s=20
नऊ महिन्यांपूर्वी माजी पंतप्रधानांची हत्या
माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्येनंतर केवळ नऊ महिन्यांनी पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर हल्ला झाला आहे. शिंजो यांच्यावर जुलै २०२२ मध्ये एका व्यक्तीने घरगुती बंदुकीने हल्ला केला होता. या घटनेत माजी पंतप्रधानांचा मृत्यू झाला होता.
https://twitter.com/JournoSiddhant/status/1647072986577657856?s=20
Pipe Bomb Attack on Japan Prime Minister Fumio Kishida