पिंपळगाव बसवंत: पोलीस कर्मचाऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांवर माणूस म्हणून पडणारा ताण लक्ष्यात घेता पिंपळगावकरांनी कायद्याच्या चौकटीत राहून व शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करत यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन नाशिक ग्रामीण पोलीसउपअधीक्षक अर्जुन भोसले यांनी केले. पिंपळगाव बसवंत शहरात साजरा होणाऱ्या आगामी गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आरोग्य अधिकारी चेतन काळे, सर्कल नीलकंठ उगले, वीज अधिकारी चौधरी, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, सहायक निरीक्षक कुणाल सपकाळे, शरद काळे, गणेश बनकर, ज्ञानेश्वर चव्हाण, भाऊ घुमरे, नितीन बनकर, अल्पेश पारख, बाळासाहेब आंबेकर, प्रशांत घोडके, मयूर गावडे, शाम निरभवणे, माणिक देवकर, बाळा बनकर, सुभाष होळकर, देवेंद्र काजळे, प्रशांत घोडके, टोलनाका मॅनेजर योगेश सिंग, अब्दुल्ला शेख, राहुल सोनवणे, उपस्थित होते.
अर्जुन भोसले यांनी आगामी गणेशोत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांची सविस्तर माहिती देत पिंपळगाव शहरात गर्दी टाळण्याच्या दृष्टीने विसर्जनासाठी ठीक ठिकाणी कुत्रीम तलाव उभारण्याच्या सूचना ग्राम पालिकेस केल्या. तर सार्वजनिक मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवात देखावे टाळून रक्तदान शिबिरासह आरोग्य शिबिरासारखे सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन करत गणेशोत्सवाचा मंडप रस्त्यात येणार नाही, शिवाय रात्री १० नंतर वाद्य वाजविण्यास किंवाआगमन व विसर्जन मिरवनुका काढण्यास परवानगी नाही, सामाजिक कार्यक्रम घेतल्यास सोशल डिस्टनसिग्नचा नियमासह सार्वजनिक मंडळाजवळ सीसीटीव्हीसह २४तास स्वंय सेवक नेमावा, गणेशोत्सवात वर्गणी साठी सक्ती न करण्याचे आवाहन देखील पोलीस उपअधिक्षक अर्जुन भोसले, उपस्थित गणेश बनकर, बाळासाहेब आंबेकर, संतोष गांगुर्डे यांनी सूचना मांडल्या. बैठकीस पिंपळगाव पंचक्रोशीतील सर्व मंडळांचे पदाधिकारी, पोलीस पाटील, राजकिय पदाधिकारी उपस्थित होते.