पिंपळगाव बसवंत: सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील शहरातील कालिका मंदिरात श्री संतसेना महाराज यांची पुण्यतिथी कोरोना नियमांसह सोशल डिस्टन्ससिंगचे काटेकोर पालन करत उत्साहात साजरी झाली. संतसेना महाराज पुण्यतिथीनिमित्त सकाळी मान्यवर व नाभिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीतर सेना महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. सत्यनारायण महापूजेसह वारकरी संप्रदयांच्या उपस्थित भजनाचा कार्यक्रम, होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर, संजय मोरे, भाजपचे सतीश मोरे, अल्पेश पारख, प्रशांत घोडके, नाभिक महामंडळाचे गोविंद वाघ, श्रीकांत वाघ, बाळासाहेब बिडवई, श्याम वाघ, सुनील गरुड, शुभम वाघ, हरीश बिडवई, गणेश बिडवे, सागर कदम,कृष्णा महाले, योगेश सैंदाणे, संतोष सोनवणे, हरीश हिरे, राहुल सोनवणे, अमोल शिंदे,किशोर बिडवे, दौलत विश्वासराव, आदिंसह पदाधिकारी समाजबांधव, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.