India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘पिंपळगाव टोल नाका बंद करा अन्यथा…’ मनसेने दिला हा कडक इशारा

India Darpan by India Darpan
October 7, 2022
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशिक शहरालगत पिंपळगाव बसवंत येथे असलेला टोलनाका कायमस्वरुपी बंद करण्याबाबत मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. हा टोल नाका त्वरीत बंद करावा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मनसेने प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर (NH3) नाशिक शहरापासून 30 किमी अंतरावर पिंपळगाव-बसवंत येथे पीएनजी टोलवे प्रायव्हेट लिमिटेड द्वारे बीओटी (बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर) तत्वावर टोल नाका बांधण्यात आला आहे. हा टोल प्लाझा राज्यात प्रथम क्रमांकाचा वादग्रस्त टोल नाका बनला आहे. राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे त्रस्त असलेल्या प्रवाश्यांना येथील टोलनाका कर्मचाऱ्यांच्या उर्मट वागण्याचा, दादागिरीचा त्रास विनाकारण सहन करावा लागत आहे.

घोटी ते चांदवड या अवघ्या ७० किमी अंतरावर ०३ टोल नाके आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत घोषणा केली आहे की, ६० किमी अंतरापेक्षा कमी अंतरावरील टोल नाके बंद करण्यात येतील. त्यामुळे  शासन नियमाप्रमाणे हा टोल नाका तात्काळ कायम स्वरुपी बंद करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्यास दिलेल्या निवेदनानुसार आपण काय कारवाई केली त्याची माहिती दोन दिवसांत लेखी स्वरुपात कळवावी, अन्यथा हा टोल नाका तात्काळ कायम स्वरुपी बंद करण्याबाबत तीव्र स्वरुपाचे जन आंदोलन उभारण्यात येईल. याची सर्व जबाबदारी आपल्या प्रशासनाची राहील, असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावर मा. प्रकल्प अधिकारी, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी या बाबत तात्काळ योग्य ती उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस अशोकभाऊ मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, शहर उपाध्यक्ष अक्षय खांडरे, सहकार सेना प्रदेश सचिव राकेश परदेशी, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष निकीतेश धाकराव, शहर संघटक अमित गांगुर्डे, मनविसे जिल्हाध्यक्ष मनोज गोवर्धने, रस्ते आस्थापना शहर संघटक विजय आहिरे, मनविसे शहर संघटक ललित वाघ, अक्षय कोंबडे, मेघराज नवले, शाखा अध्यक्ष पंकज दातीर हे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Pimpalgaon Baswant Toll Naka MNS Threat


Previous Post

टायर चोर सक्रिय; एकाच रात्रीत पार्किंगमध्ये लावलेल्या ७ रिक्षांचे ११ टायर चोरीला

Next Post

‘आप’ आमदाराने केले पक्षाच्याच कार्यकर्त्याशी लग्न; अत्यंत साधेपणाने समारंभ

Next Post

'आप' आमदाराने केले पक्षाच्याच कार्यकर्त्याशी लग्न; अत्यंत साधेपणाने समारंभ

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group