नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महागाईपासून होरपळणाऱ्या सर्वसामान्यांसाठी अतिशय दिलासादायक वृत्त आहे. कारण, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरल्या आहेत. त्याचा परिणाम भारतावरही होत आहे. म्हणूनच येत्या काळात पेट्रोलचे दर तब्बल १० ते १२ रुपयांनी घसरण्याची चिन्हे आहेत. तसे संकेत सध्या मिळत आहेत. तसे झाले तर ऐन सणासुदीत ग्राहकांना मोठ्ठा दिलासा मिळणार आहे.
जागतिक बाजारपेठेतील कच्चे तेल म्हणजेच पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या की, महागाईचा भडका उडतो आणि सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसतो, साहजिकच पेट्रोल डिझेलच्या किमतीकडे सर्वांचेच लक्ष असते, परंतु येत्या दसरा दिवाळी या सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांनी ग्राहकांना दिलासा मिळणार आहे, किंबहुना त्यांचा हा सण काहीसा आनंदातच जाणार आहे, असे दिसून येते. कारण येत्या काळात पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये चांगली म्हणजे किमान दहा ते पंधरा रुपयांनी घट होण्याची शक्यता आहे त्याबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण झाली आहे. मात्र तरी देखील देशांतर्गत बाजारात साडेतीन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर समान पातळीवर राहिले. क्रूडमध्ये अजूनही सातत्याने घसरण सुरू असून सणासुदीच्या काळात जनतेला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा बाजारपेठ आणि व्यापार क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर १२ रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल ९० डॉलरच्या आसपास असूनही, काल रविवारी म्हणजेच दि. १९ सप्टेंबर रोजी देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सारख्याच होत्या. कच्च्या तेलाच्या किमती सुमारे आठवडाभरापासून कमीच आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर या घटीच्या प्रमाणात तेल कंपन्यांनी दरात कपात केली तर पेट्रोल आणि डिझेलचे दर किमान ११ ते १२ रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात, असे सांगण्यात येते.
गेल्या एक दोन वर्षांत देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने घट सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खनिज तेल २५ ते ३० डॉलरनी स्वस्त झाले आहे. सध्या क्रूड ऑईल ९१ डॉलर प्रति-बॅरल दरावर ट्रेंड होत आहे. मात्र भारतात पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये फारशी घट झालेली नव्हती. त्यानंतर २१ मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील कर कमी केलयानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सुमारे ९ आणि ७ रुपयांनी घट झाली होती.
सध्या ब्रेंट क्रूड ऑईल ९१ डॉलर प्रति बॅरलवर ट्रेंड करत आहे. तेलक्षेत्रातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार क्रूड ऑईलच्या किमती ह्या ८०.८५ डॉलरपर्यंत घसरू शकतात. या घटीच्या प्रमाणात तेल कंपन्यांनी दरात कपात केली तर पेट्रोल आणि डिझेलचे दर ११ ते १२ रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात. साधारणतः खनिज तेलाच्या किमतींमध्ये १ डॉलर प्रति बॅरलने वाढल्यास किंवा घटल्यास देशात तेल कंपन्यांना एक लिटरमागे सुमारे ४५ पैशांचा परिणाम होतो. या हिशोबाने देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये ११ ते १२ रुपयांची घट होऊ शकते.
सध्या मुंबईमध्ये पेट्रोल सुमारे १११.३५ रुपये आणि डिझेल सुमारे ९७.२८ रुपये प्रतिलीटर दराने मिळते. अर्थात पेट्रोल डिझेलचे दर हे दररोज सकाळी नव्याने जाहीर होतात, तसेच प्रत्येक शहरात हे दर वेगवेगळे असतात, नवी दिल्ली येथे मुंबईपेक्षा पेट्रोल डिझेलचे दर हे साधारणतः दोन ते चार रुपयांनी कमी असतात, तर महाराष्ट्रात परभणी शहरात पेट्रोल डिझेलचे दर हे सर्वाधिक म्हणजे मुंबई पुण्यापेक्षा चार ते पाच रुपयांनी जास्त असतात, असे आढळून आले आहे.
Petrol Prices Will Reduce up to 10 to 12 Rupees Soon
Fuel Crude Oil
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी
खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD