पेठ – पेठ नगर पंचायतीच्या सत्ता स्थापनेत राष्ट्रवादीचा वरचष्मा कायम राहील्याने १७ सदस्य असलेल्या नगरपंचायतीत राष्ट्रवादीने ८ जागा जिंकून सत्तेचा मार्ग मोकळा केला. मात्र बहुमतासाठी १ जागा कमी पडत असल्याने शिवसेनेशी हातमिळवणी करूण सत्ता स्थापने शक्य असताना भविष्यातीलं राजकीय व्युहरचनेसाठी माकप (३), भाजप (१), अपक्ष (१) असे १३ सदस्यांचा गट स्थापन करूण शिवसेनेस एकाकी पाडण्यात आले.
नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष निवडीसाठीच्या दोन्ही जागांसाठी शिवसेनेने उमेदवार दिलेले असल्याने निवडीचे वेळी काही चमत्कार घडवला जाईल असा तर्क लढविला जात होता . अध्यक्षीयपदासाठी राष्ट्रवादीतर्फे करण करवंदे तर शिवसेनेकडून मावळते नगराध्यक्ष मनोज घोंगे असा दुरंगी सामना होता. मात्र प्रत्यक्ष निवडीचे वेळी सभागृहात हातवर करूण संमतीसाठी करण करवंदे यांचेसाठी १३ नगरसेवकांनी सहमती दिल्याने करवंदे यांना १३ तर प्रतिस्पर्धी मनोज घोंगे यांना ४ नगरसेवकांची सहमती असल्याने करण करवंदे यांनी निर्णायक सहमती मिळविल्याने त्यांना नगराध्यक्ष घोषीत करण्यात आले. तर उपनगराध्यपदासाठी राष्ट्रवादी पुरस्कृत माकपच्या अफरोजा शेख तर सेनेतर्फे प्रकाश धुळे यांची दुरंगी लढतही तशीच झाल्याने माकपच्या अफरोजा शेख यांना उपनगराध्यक्ष म्हणून घोषीत करण्यात आले. निवडणूकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणुन दिंडोरीचे तहसिलदार पंकज पवार यांनी काम पाहीले
झिरवाळांकडून निवडणूकीत दिलेल्या अश्वासनाची पूर्तता
नगरपंचायत निवडणूकीत आ. नरहरी झिरवाळ यांनी राष्ट्रवादीस मतदान करण्याचे अवाहन करतांना पेठ शहरासाठी वैकुठ रथ ( मोक्ष रथ ) देण्याचे अश्वासन देण्यात आले होते. पक्षाचा नगराध्यक्ष होताच आ. झिरवाळांनी पदाधिकारी निवडीच्या दिवशीच वैकुंठ रथ लोकार्पण करण्यात आला व आपण दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली .