इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एखाद्या व्यक्तीनी किती लग्न केले असतील असे कुणी विचारले तर सांगितले जाईल की २ किंवा ५. पण, एखाद्या व्यक्तीने थोडेथोडके नाही तर तब्बल ७५ लग्न केल्याचे कुणी सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का. हो पण हे खरे आहे. पोलिसांच्या तपासात ही बाब उघड झाली आहे.
पैशासाठी काही विकृत मनोवृत्तीचे नागरिक तथा गुन्हेगार काय करतील याचा नियम नाही. गैरमार्गाने किंवा अवैध धंद्यातून पैसे मिळवण्यासाठी एका बांगलादेशी तरुणाने चक्क 200 मुलींची फसवणूक करून त्यांना भारतात आणले इतकेच नव्हे तर त्यांना बांगलादेश मधून भारतात आणण्यासाठी त्यापैकी 75 मुलींची बनावट पद्धतीने विवाह केले या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
सुमारे 28 वर्षांच्या या तरुणाने 75 लग्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या तरुणाचे नाव आहे मुनीर उर्फ मुनीरुल याला सूरतवरुन अटक केल्यानंतर, त्याच्या चौकशीत त्याने केलेल्या विवाहांची संख्या ऐकून खुद्द पोलीसही चक्रावले. सुमारे 75 लग्न करणाऱ्या या तरुणाची गु्न्ह्यांची गाथा ऐकल्यावर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
दीड वर्षांपूर्वी इंदूर पोलिसांनी 21 बांग्लादेशी तरुणींना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत मुनीरसह इतर नावे समोर आली होती. त्यानंतर मुनीरच्या काही साथीदारांना अटक करण्यात आली होती,. त्यावेळी पळून जाण्यातही मुनीर यशस्वी ठरला होता. त्यानंतर त्याला सूरतमधून अटक करण्यात आली होती. मुनीर हाही स्वता बांग्लादेशचा रहिवासी होता. सध्या तो इंदूरच्या जेलमध्ये अटकेत आहे. बांग्लादेशी तरुणींना भारतात आणण्यासाठी मोठे नेटवर्क काम करीत होते. मुलींना भारतात आणल्यानंतर त्यांना आधी कोलकत्यात आणले जात असे मग त्यांना मुंबईत हलवण्यात येत असे.
बांग्लादेशी मुलींना भारतात आणण्यासाठी मुनीर त्यांच्याशी लग्न करीत असे. मुनीर केवळ सीमा पार करण्यासाठी या मुलींशी लग्न करीत असे. त्यानंतर त्यांना घेऊन तो भारतात येत असे. मुनीर उर्फ मुनीरुल याला ऑक्टोबर 2021 मध्ये सेक्स रॅकेट प्रकरणात इंदूर पोलिसांनी सूरतमधून अटक केली. इंदूरमध्ये अटक करण्यात आलेल्या काही बांग्लादेशी तरुणींच्या चौकशीत याचे नाव समोर आले होते. या मुलींना बांग्लादेशातून सीमा पार करुन मुनीर यानेच भारतात आणले होते. मुनीरने बांग्लादेशातून आणलेल्या सुमारे 200 मुलींना भारतात देह विक्रीच्या धंद्यात लोटले होते.
या 200 पैकी 75 मुलींशी त्याने स्वतः विवाह केला होता. त्याला अटक करण्यात आल्यानंतर ही माहिती पुढे आली. त्यामुळे तपास यंत्रणाही हादरली. तो प्रत्येक महिन्याला बांग्लादेशातून मुली भारतात आणत होता. सीमेवर तपासणीत या मुली आपल्या पत्नी असल्याचे तो भासवित असे. त्याचबोरबर त्यांच्याशी लग्न झालेले फोटोही तो सीमेवरील तपास अधिकाऱ्यांना दाखवत होता. त्या फोटोत तो त्यांचा नवरा असे.
मुनीर या सगळ्यात फारच तरबेज होता. अनेक सरकारी यंत्रणांना चकवा देत तो परदेशी मुलींना भारतात आणत होता. प्रत्येक कागदपत्रावर त्याची वेगवेगळी नावे असत. मुंबई, सूरत आणि इंदूर सारख्या मोठ्य़ा शहरांत सेक्स रॅकेटमध्ये सामील असलेल्यांना तो या मुली विकत असे. मुनीरने आणलेल्या मुलींचे ग्राहक हे हायप्रोफाईल लोक होते. त्यामुळे त्याला या धंद्यात जास्त मागणीही होती.
सीमेवरील आणि राज्यांच्या पोलिसांना चकवा देत तो या मुलींना भारतात आणीत असे. भारत-बांग्लादेशातील पोरस बॉर्डरवरुन तो या मुलींना देशात आणीत होता. बॉर्डरवर त्याचे काही ठरलेले एजंट होते, त्यांना तो मोठी रक्कमही देत असे. हीच लोकं त्याच्यासाठी कागदपत्रे तयार करीत असतं. ज्या मुलींना आणण्यात अडचणी येत असत, त्यांच्याशी मुनीर लग्न करीत असे. त्याने इतक्या मुली आणल्या पण कुणालाही साधी याची कुणकुणही लागली नाही, याचे आश्चर्य आहे.
बांग्लादेशातून आणलेल्या मुली मुनीर मुंबईत विकत असे. या मुली फक्त त्याच्या कागदोपत्री पत्नी असत. त्यांना मुंबईत आणल्यानंतर त्यांचे पर्सनलिटी डेव्हलपमेंटचे ट्रेनिंग होत असे. त्यानंतर देशभरात गरजेप्रमाणे या मुलींना पाठवण्यात येत असे. बांगलादेशातून आणलेल्या मुली या गरीब घरातील असत. मुनीर आणि त्याचे साथीदार याचाच फायदा घेत असत. त्यांच्या कुटुंबीयांना पैशांचे लालूच दाखवून या मुलींना ते जाळ्यात ओढत. बॉर्डरपासून जवळ असलेल्या गावात मुनीरची माणसे हे काम करीत असत. त्यानंतर या मुलींना भारतात आणून त्यांना देहविक्रीच्या धंद्यात टाकत असे.
या मुली मुनीर 30 हजार ते दीड लाखांपर्यंत विकत असे. यातील अनेक मुलींच्या पतीच्या नावी मुनीर याचा उल्लेख असे. भारताचे खोटे नागरिकत्वही या तरुणींना देण्यात येत असे. त्यामुळे त्या पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांपासून बचाव करुन घेत असत. यातील अनेक मुली या स्पा सेंटर्समध्ये काम करीत होत्या. इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेर, मुंबई, पुणे, बंगळुरु, अहमदाबाद, सूरतमध्ये या मुली काम करीत असत.
Person Arrested Married 75 Girls Investigation Crime
Bangladesh Human Trafficking Sex Racket Munir
Women Sale