इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सुप्रसिद्ध गायक अर्जुन कानूंगो नुकताच विवाहबंधनात अडकला. मात्र या लग्नात सर्वाधिक चर्चा झाली ती बॉबी देओल आणि तान्या देओल यांची. या कार्यक्रमात एका फोटोसाठी पोझ देताना तान्या हिने बॉबी देओल याला दिलेल्या वागणुकीमुळे सध्या ती सोशल मीडियावर भलतीच ट्रोल होते आहे.
गायक अर्जुन याने आपल्या लग्नसमारंभाचे निमंत्रण मोठमोठ्या सेलिब्रिटींना दिले होते. त्यामुळेच बॉबी आणि तान्या देओलही त्याला उपस्थित होते. यावेळी फोटो काढताना तान्याने बॉबीला दिलेली वागणूक नेटकऱ्यांना खटकली आहे. यावरून तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आणि यानंतरच कॉमेंट्स येऊ लागल्या आहेत.
हिच्यामुळे बॉबी देओलला फोटोग्राफर समोर लाज वाटली असेल, असे एकाने म्हटले आहे. तर दुसऱ्याने एवढा कसला ऍटिट्यूड आहे, अशी टीका तान्यावर केली आहे. या कार्यक्रमात येण्यापूर्वी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले असावे, असा अंदाज एकाने वर्तवला आहे, तर लग्नाला १५ ते २० वर्षे पूर्ण झाली की, असेच होत असल्याच्या अनुभवी प्रतिक्रियाही सोशल मीडियावर दिसत आहेत.
बॉबी देओल नुकताच ‘आश्रम 3’ या वेब सीरिजमध्ये झळकला आहे. प्रेक्षकांकडून या सीरिजला चांगलाच प्रतिसाद मिळाला. प्रकाश झा दिग्दर्शित या वेब सीरिजवर अनेक आरोपही झाले. हिंदूंना यामध्ये चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून गेल्या वर्षी भोपाळमधील या सीरिजच्या सेटवर तोडफोडसुद्धा करण्यात आली होती.
Actor Bobby Deol Wife Tanya Troll in Social Media
Entertainment Bollywood