India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अररर…! पतंजली उद्योगाची ऑनलाईन बैठक सुरू असताना अचानक सुरू झाला पॉर्न व्हिडिओ…

India Darpan by India Darpan
December 22, 2022
in राष्ट्रीय
0

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऑनलाईन मिटींग (झुमवरील बैठका) मध्ये अनेकदा काही मजेशीर आणि हास्यास्पद घटना घडत असतात. आता, बाबा रामदेव यांच्या पतंजली ब्रँडशी संबंधित अधिकारी वर्गाच्या बैठकीत एक हास्यास्पद घटना घडली आहे. या बैठकीत उपस्थित एका व्यक्तीकडून अचानक पॉर्न व्हिडिओचं स्ट्रीमिंग करण्यात आलं. त्यानंतर, या झुम मिटींगमध्ये एकच गोंधळ उडाला. या बैठकीत काही महिलाही सहभागी होत्या. याप्रकरणी आता पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाईन बैठकांसाठी अप टू डेट अशा प्रकारात सर्वचजण असतील नसतात त्यामुळेच काही मनोरंजक घटना घडत असतात. योगपीठशी संबंधित आरोग्य संशोधन केंद्रात एक ऑनलाईन बैठक सुरू होती. बैठकीला देशविदेशातील अनेकजण उपस्थित होते. पुण्यातून मीटिंगमध्ये सहभागी झालेल्या एका तरुणानं पॉर्न व्हिडीओ सुरू केला. तरुणानं हा प्रकार जाणूनबुजून केला की त्याच्या हातून चुकून घडला हे स्पष्ट झालेलं नाही. पण, मीटिंगमध्ये पॉर्न व्हिडीओ सुरू झाल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी हरिद्वारच्या बहादराबाद येथील पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर, पोलिसांनी माहिती व तंत्रत्रान कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल केला आहे. पुण्यातील येरवडास्थित कॉलेज कॅम्पसजवळ राहणाऱ्या आकाश नामक व्यक्तीविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतंजलीशी संबंधित कमल भदौरिया आणि शिवम वालिया यांनी तक्रार नोंदवली. पतंजलीकडून एक तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती एसएसपी अजय सिंह यांनी दिली.

दिव्या फार्मसीची उत्पादने बॅन
पतंजलीची सर्व उत्पादने बनवणाऱ्या बाबा रामदेव यांच्या दिव्या फार्मसीला एक धक्का बसला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांची पूर्तता न केल्यामुळे नेपाळ या देशाने दिव्या फार्मसीला काळ्या यादीत टाकले आहे म्हणजेच बॅन केले आहे. हे कठोर पाऊल केवळ दिव्या फार्मसीबरोबरच १६ भारतीय औषध कंपन्यांविरुद्ध उचलण्यात आले आहे.

Patanjali Online Meeting Play Porn Video Complaint
Cyber Crime


Previous Post

अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या भरती प्रक्रियेबाबत सरकारने दिली ही माहिती

Next Post

धुळे जिल्ह्यातील शाळांबाबत तब्बल अर्धा तास चर्चा; अखेर झाला हा निर्णय

Next Post

धुळे जिल्ह्यातील शाळांबाबत तब्बल अर्धा तास चर्चा; अखेर झाला हा निर्णय

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group