बंगळुरू – शहर परिसरात अतिवृष्टी झाल्याने शहरातील सर्व रस्त्यांवर पाणी साचले. विमानतळाच्या प्रवेशद्वारावर, उड्डाणपुलाखाली असे सर्वच रस्ते पाण्याने भरले. या सर्व परिस्थितीमुळे ज्या प्रवाशांना विमानाने जायचे आहे त्यांना विमानतळावर वेळेत पोहचणे शक्य होत नसल्याचे दिसून आले. कारण, काही रस्त्यांवर वाहतूक कोंडीही झाली. मात्र, काही प्रवाशांनी नामी शक्कल लढविली. त्यांनी थेट ट्रॅक्टरद्वारेच थेट विमानतळ गाठले. ट्रॅक्टरमधून प्रवासी उतरताना पाहून इतरही अनेक प्रवासी अचंबित झाले. बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/ANI/status/1447746369465159681?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1447746369465159681%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fd-32740275384125245086.ampproject.net%2F2109272305001%2Fframe.html