इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे कपल काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा नुकताच नवी दिल्लीत पार पडला.
अत्यंत राजेशाही थाटात आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा साखरपुडा झाला. सोशल मिडीयावर प्रसिद्ध झालेल्या या साखरपुड्याच्या फोटोंना नेटकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. साखरपुड्यानंतर परिणीती आणि राघव या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लग्न करण्याची शक्यता आहे.
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची लव्ह स्टोरी लंडनमध्ये सुरुवात झाली. त्यानंतरही अनेक ठिकाणी ते सातत्याने एकत्र दिसले. त्यांच्याबाबत चर्चा सुरू झाली असली तरी या दोघांनीही आपल्या नात्याबाबत कधीच उघडपणे काहीही सांगितले नाही. नुकताच त्यांनी दिल्लीत १३ मे रोजी साखरपुडा केला. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यातील एका फोटोमुळे त्यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे. या ट्रोल करणाऱ्यांना परिणीतीने सडेतोड उत्तर दिले आहे. नुकताच परिणीती चोप्रा हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत उत्तर दिले आहे.
परिणिती – राघव का झाले ट्रोल?
राघव आणि परिणीती चोप्रा हे हात जोडून अकाल तख्त साहिबच्या जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंग यांच्यासमोर उभे असल्याचे परिणीतीने शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसते आहे. आता परिणीती चोप्रा हिने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याला जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंह यांनी हजेरी लावली होती.
हरप्रीत सिंग यांचा एक फोटो व्हायरल झाला. त्यानंतर ते चांगलेच ट्रोल झाले आहेत. फोटो शेअर करत परिणीती चोप्रा हिने अकाल तख्त साहिबचे जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंह यांच्याबद्दल लिहिले आहे. अकाल तख्त साहिबचे जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंगजी यांचा आशीर्वाद घेऊन आनंद वाटला. आमच्या साखरपुड्यात त्यांची उपस्थिती खूप महत्त्वाची आहे, असे परिणीती चोप्रा हिने म्हटले आहे. हरप्रीत सिंग जो वाद सुरू होता, त्यालाच परिणितीने एकप्रकारे उत्तर दिले आहे.
पंजाब सरकारशी हरप्रीत सिंग यांचे वाद
अकाल तख्त साहिबचे जथेदार ग्यानी हरप्रीत सिंह १३ मे रोजी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात उपस्थित होते. जथेदार ग्यानी हरप्रीत सिंह एक धार्मिक गुरू आहेत आणि काही दिवसांपूर्वी पंजाबमधील आप सरकारशी त्यांचे काही मुद्द्यांवरून भांडण झाले होते. त्यानंतरही त्यांनी आपचे खासदार राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याला उपस्थिती दर्शवल्याने नेटकरी नाराज झाले आहेत.