नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील तोफखाना केंद्रीय विद्यालयात परीक्षा पे चर्चा उपक्रमांतर्गत 23 जानेवारी रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण तणाव कमी करण्यासाठी सोपे मंत्र देतात. केंद्रीय विद्यालय संगठन आणि शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून मिळालेल्या पत्राच्या अनुपालनार्थ हा कार्यक्रम आयोजित केला जाईल.
चित्रकला स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील 6 केंद्रीय विद्यालये, नवोदय विद्यालय, राज्य शासनाच्या शाळा आणि सीबीएसई मान्यताप्राप्त शाळांमधील एकूण 100 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तोफखाना केंद्रीय विद्यालय, नाशिक यांच्याकडे नोडल शाळा म्हणून या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परीक्षेचा ताण तणाव कमी कसा करता येईल, हे सूत्र लक्षात घेऊन पंतप्रधानांनी दिलेले 25 विविध सुलभ मंत्र हेच चित्रकला स्पर्धेचे आधार विषय आहेत, अशी माहिती प्राचार्य देवेंद्र कुमार ओलावत यांनी दिली.
Pariksha Pe Charcha KVNRC Selected Drawing Competition
Nashik