India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

यंदा मकर संक्रांत कधी आहे? यादिवशी काळे कपडे का घालतात? पुण्यकाळ कोणता?

India Darpan by India Darpan
January 13, 2023
in साहित्य व संस्कृती
0

 

वैभव शिंगणे, नाशिक
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. ग्रहांच्या एका राशीतून दुसऱ्या राशित प्रवेश करण्यास संक्रांत म्हटले जाते. या दिवसा आधी रात्र मोठी व दिवस लहान असतो. पण या दिवशी दिवस व रात्र दोन्ही समान असतात. तसेच संक्रांतीपासून ऋतू बदलायला सुरुवात होते. हवेतील गारवा कमी होऊन उष्णता वाढायला लागते. म्हणून हा सण साजरा केला जातो.

भोगी
संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. थंडीत भाजीपाला मुबलक व स्वस्त असतो. त्यामुळे सर्व भाज्या एकत्र करु खाल्ल्या जातात. ठंडीपासून बचावासाठी तीळ लावून बाजरीची भाकरी खाल्ली जाते. थंडीपासून बचावाकरिता व शरीरात उष्णतेच्या वाढी करता तीळ व गुळाचे सेवन केले जाते.

यंदा १५ जानेवारीला संक्रांत 
हिंदू धर्मानुसार, सर्व सण पंचांगाच्या तिथीप्रमाणे साजरे होत असल्याने कोणत्याही सणाची निश्चित अशी तारीख सांगता येत नाही. पण हा सण दरवर्षी १४ जानेवारी येतो मग असे का? असा प्रश्न आपल्याला पडला असेल. याचे करण ज्योतीष गणनेचे दोन पंचांग आहेत एक सायन तर दुसरे निर्यन. चंद्र ग्रहाप्रमाणे गणनेला निर्यन तर सूर्य ग्रहाप्रमाणे गणनेला सायन म्हणतात. इतर सर्व सण आपण निर्यन पंचांगाप्रमाणे साजरे करतो तर मकरसंक्रांत हा सण सायन पंचांगाप्रमाणे साजरा करतो. यामुळे १४ जानेवारीला हा सण येतो. सायन पंचाग गणने नुसार सुर्यच्या अंक्ष, कला व दिवस यांचे गणित बसवण्या करिता दर आठ वर्षांनी एक दिवस वाढवला जातो. त्यामुळे दर आठ वर्षांनी संक्रांत ही १५ जानेवारीला येते. उदा.ज्याप्रमाणे इंग्रजी कॅलेंडरमध्ये लीप वर्ष येते. फेब्रुवारीत एक दिवस वाढवला जातो. त्याप्रमाणे.
यंदा मकर संक्रांतीचा पुण्यकाल १५ जानेवारी २०२३ रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे. दिनांक १४ जानेवरी २०२३ रोजी रात्री ८:४४ वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे.

काळे कपडे का घालतात?
याची अनेक कारणे सापडतात. हिवाळ्यामुळे काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने सूर्य किरणांमुळे शरीर गरम राहते. उबदारपणा मिळतो. काळ्या कपड्यामुळे चेहऱ्याचा रंग व हलव्याचे दागिने खुलुन दिसतात. दृष्ट व वाईट नजर या गोष्टींना मानणा-या व्यक्तीच्या मते काळा रंगाचे कपडे घातल्याने नजर लागणाचा धोका संभवत नाही. यामुळेच इतर काणत्याही सणात प्रवेश नसलेल्या काळ्या रंगाला संक्रातीत मात्र मानाचे स्थान आहे.

Makar Sankranti Festival Importance Black Cloths


Previous Post

कॅनाल मध्ये दुचाकीसह पडून एकाचा मृत्यू; अपघात नसून घातपात असल्याचा नातेवाईकांचा आरोप

Next Post

‘परीक्षा पे चर्चा’च्या चित्रकला स्पर्धेसाठी तोफखाना केंद्रीय विद्यालयाची निवड; जिल्ह्यातील १०० विद्यार्थी होणार सहभागी

Next Post

'परीक्षा पे चर्चा'च्या चित्रकला स्पर्धेसाठी तोफखाना केंद्रीय विद्यालयाची निवड; जिल्ह्यातील १०० विद्यार्थी होणार सहभागी

ताज्या बातम्या

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

February 3, 2023

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

February 3, 2023

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

February 3, 2023

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

February 3, 2023

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group