दीव – अनेक पर्यटक हे साहसी पर्यटनाला प्राधान्य देतात. बऱ्याचदा एकट्याने तर कधी संपूर्ण कुटुंबासमवेत, कधी पत्नीसमवेत, कधी मुला किंवा मुलीसमवेत काही जण साहसी पर्यटन करतात. याचदरम्यान योग्य ती सुरक्षा आणि खबरदारी न घेतल्याने अनावस्था प्रसंगाला सामोरे जावे लागते. येथे अशीच एक घटना घडली आहे. एक दाम्पत्य समुद्र किनारी साहसी पर्यटन करीत होते. काही मिनिटे दाम्पत्याला भारी मजा वाटली. मात्र, अचानक पॅराशुटचा दोर तुटला. काही सेकंदांमध्येच होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे हे दाम्पत्य थेट समुद्रातच कोसळले. हे दाम्पत्य गुजरातच्या जुनागड जिल्ह्यातले आहे. या सर्व प्रकरणामुळे हे दाम्पत्य प्रचंड भयभीत झाले. पॅराग्लायडिंग करणारे कर्मचारी आणि कंपनी यात दोषी आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणी या दाम्पत्यासह पर्यटकांनी केली आहे. बघा हा थरारक व्हिडिओ
https://twitter.com/RahulDharecha/status/1459827449538121733