पालघर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पालघरमध्ये चोरीनंतर एक अजब घटना घडली.एका चोरट्याने चक्क १५ तोळे सोने परत केले, त्याच्या कृतीने पोलिसांसह सर्वांचच मन जिंकले. वास्तविक चोरांना काही दया, माया नसते, असे म्हणतात, कारण आपण कष्टाने कमावलेला पैसा, दागिने यावर ते डल्ला मारतात, फुकटचा ऐवज लंपास करताना त्यांना काहीही वाटत नाही. मात्र काही चोर त्याला अपवाद असतात? , असे म्हणता येईल, कारण पालघरमधील एका चोराच्या कृतीने पोलिसांसह सर्वांचच मन जिंकले.
महिलांची रडारड
पालघरमधील केळवे येथे राहणाऱ्या प्रतीक्षा ठकसेन तांडेल यांच्या घरी चोरी झाली होती. त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले दागिने चोरट्याने लंपास केले होते. त्यामुळे घरातील सर्वजण हैराण झाले होते, नेमके काय करावे, कुणाला सूचेना. घरातील महिला दुःखाने रडत होत्या. त्यामुळे या प्रकरणात तांडेल कुटुंबियांनी केळवे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ठकसेन यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक नागरिकांना आवाहन केले.
चोराची चिठ्ठी
हे सोने आता परत मिळणार नाही, असे सर्वांनाच वाटले. परंतु दैवयोगाने ते परत मिळाले असे म्हणता येईल, कारण चोराट्याने पोलिसांचे भावनिक आवाहन ऐकले. त्याला साथ देत पाझर फुटलेल्या चोरट्याने तीन दिवसानंतर तब्बल १५ तोळ सोने रात्रीच्या सुमारास प्रतीक्षा तांडल यांच्या भावाच्या घरासमोर आणून ठेवले. इतकेच नव्हे तर मला माफ करा, अशी चूक मी पुन्हा करणार नाही, अशी चिठ्ठी देखील चोरट्याने लिहिली. काहीही असो, फिर्यादींना आपले सोन पुन्हा मिळाले असून त्यांनी पोलिसांचेही आभार मानले आहेत. तर दुसऱ्या बाजूला पोलीसांचे हे जनसंवाद अभियानाचे यश असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
Palghar Crime Theft Gold Return