इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडचे कलाकार त्यांच्या चाहत्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय असतात. त्यांची चाहत्यांमध्ये भलतीच क्रेझ असते. कलाकार देखील आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यामुळेच जवळपास सगळे कलाकार हे सोशल मीडियावर सक्रिय असलेले दिसतात. यातीलच एक अभिनेत्री सनी लिओनी. सनी ही नेहमीच चर्चेत असते. पॉर्नस्टार म्हणून सुरुवात करणाऱ्या सनीने नंतर बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. सनीचे हे बदललेले रूप प्रेक्षकांनी देखील स्वीकारले. यासोबतच ती नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. सनीने नुकतीच एका चाहत्याने केलेल्या अजब मागणीवर कमेंट केली आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आहे.
सनीचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायमच चाहत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तर देत असते. पाकिस्तानचा रहिवासी असलेल्या ए. एम. खान याने त्याच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट केली होती. सनी लिओनीनं मला रिप्लाय केला तर मी सिगारेट सोडेन, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले होते. यावर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या होत्या. पण, यावर अनपेक्षितरित्या सनी लिओनीने प्रतिक्रिया दिली आहे. “…मग तू सिगारेट केव्हा सोडतो आहेस?” असा प्रश्न सनीनं त्याला विचारला. स्वत:ला सनीचा चाहता म्हणवणाऱ्या ए. एम. खान याच्या पोस्टवर सनीने कमेंट केली. तिच्या या उत्तरानंतर त्या चाहत्याने प्रतिक्रिया दिली आहे. “आश्चर्यकारक…! धन्यवाद तू प्रतिक्रिया दिल्याबद्दल.!!”, असे त्याने म्हटले आहे. याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक वेगळाच ट्रेंड दिसतो आहे. अनेक नेटकरी तसेच चाहते आपापल्या आवडत्या कलाकाराला टॅग करत विविध मागण्या करत आहेत. यावरुन ते ट्रोलही होत असले तरी हा ट्रेंड चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. शाहरुख खानला देखील त्याच्या बहुचर्चित पठाणच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती.
Pakistani Fan Demand Actress Sunny Leone