सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

न्यूझीलंडला हरवून पाकिस्तान थेट अंतिम फेरीत; भारताशी मुकाबला होणार?

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 9, 2022 | 6:03 pm
in राष्ट्रीय
0
Pakistan Team e1667997069692

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा ७ गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पाकिस्तानने तब्बल १३ वर्षांनंतर टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. या संघाने शेवटच्या वेळी २००९ मध्ये अंतिम सामना खेळला होता आणि त्यादरम्यान संघ विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला होता. १० नोव्हेंबरला भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा उपांत्य सामना खेळवला जाणार आहे, जर रोहित शर्माचा संघ या सामन्यात विजय नोंदवण्यात यशस्वी ठरला तर १३ नोव्हेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विजेतेपदाची लढाई चाहत्यांना पाहायला मिळेल.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना डॅरिल मिशेलच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने १५२ धावा केल्या होत्या. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या उत्कृष्ट भागीदारीच्या जोरावर पाकिस्तानने ५ चेंडू राखून ही धावसंख्या गाठली. बाबर आणि रिझवान यांच्यात पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली.

१५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मोहम्मद रिझवानने पाकिस्तान संघाला आक्रमक सुरुवात करून बाबर आझमचे दडपण दूर केले. आतापर्यंतच्या विश्वचषकात या दोन्ही खेळाडूंची बॅट शांत होती, पण उपांत्य फेरीसारख्या मोठ्या टप्प्यावर बाबर-रिजवान दोन्ही संघांच्या अपेक्षांवर खरा उतरला. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली. बाबर आझमला ट्रेंट बोल्टने वैयक्तिक ५३ धावांवर बाद करून संघाला पहिला धक्का दिला. यानंतर १३२ धावांवर बोल्टने रिझवानलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रिझवानने ५७ धावांची शानदार खेळी केली. लक्ष्य गाठताना संघाला तिसरा धक्का मोहम्मद हरिसच्या रूपाने बसला, जो २६ चेंडूत ३० धावा करून बाद झाला.

उपांत्य फेरीच्या सामन्यात केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. डॅरेल मिशेलच्या अर्धशतकाच्या जोरावर किवी संघाने पाकिस्तानसमोर विजयासाठी १५३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मिचेलने विल्यमसनसोबत ६८ आणि नीशमसोबत नाबाद ३५ धावांची भागीदारी केली. मिचेलने ३५ चेंडूंत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५३ धावांची नाबाद खेळी खेळली. पाकिस्तानकडून शाहिद आफ्रिदीने दोन बळी घेतले.

Pakistan T20 World Cup 2022 Final

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सायखेडा गोदापात्रात बुडालेल्या युवकाचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला

Next Post

मेटाचा मोठा निर्णय! तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढणार; मार्क झुकरबर्ग म्हणाले…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

या योजनेच्या उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढविण्यात येणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 15, 2025
Untitled 21
संमिश्र वार्ता

बीड पुरात भारतीय लष्करी दक्षिण कमांडच्या थार रॅप्टर्स विमानदलाची जलद बचाव मोहीम

सप्टेंबर 15, 2025
CM
संमिश्र वार्ता

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा या तारखेपासून शुभारंभ….

सप्टेंबर 15, 2025
Untitled 20
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा…बघा, व्हिडिओ

सप्टेंबर 15, 2025
PETROL PUMP
संमिश्र वार्ता

टँकरमधून होणारी इंधन चोरी….पेट्रोल डीलर्स असोसिएशनने चोरीचा असा केला पर्दाफाश

सप्टेंबर 15, 2025
Untitled 19
स्थानिक बातम्या

नाशिकच्या केंब्रिज स्कूलमध्ये बॅाम्ब…शाळा प्रशासनाने दिली ही माहिती

सप्टेंबर 15, 2025
accident 11
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया अपघातात भरधाव वाहनांनी दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू

सप्टेंबर 15, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

वक्फ संशोधन कायद्याला आव्हान देणा-या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

सप्टेंबर 15, 2025
Next Post
facebook meta

मेटाचा मोठा निर्णय! तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढणार; मार्क झुकरबर्ग म्हणाले...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011