इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांच्या बाबतीत कायम ट्रॅजेडी होत आली आहे. कुठलाही माजी पंतप्रधान वादाशिवाय आयुष्य जगला असेल तर नवलच. नवाज शरीफ यांच्याही बाबतीत काही वेगळे घडले नाही. ते सध्या पाकिस्तानसाठी फरारी आहेत. पण तिकडे लंडनमध्ये ऐशोआरामात आयुष्य जगत आहेत. एका व्हिडिओमुळे त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाकिस्तानने फरारी घोषित केले असून ५० रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्यात आले आहे. पण ही सुटका करून घेऊन नवाज शरीफ यांनी स्वतःला दुसऱ्या देशात कोंडून वगैरे घेतलेले नाहीत. आपल्या दिवाळखोरीत निघालेल्या देशातून बाहेर राहून ते मजा करत आहेत. त्यांचा हा माहोल अलीकडेच एका व्हिडियोमध्ये टिपण्यात आला आणि त्यावरूनच सध्या ते ट्रोल होत आहेत. जगातील श्रीमंत देशांपुढे हात पसरून भीक मागण्याची वेळ सध्या पाकिस्तानवर आली आहे. पण त्यांचे माजी पंतप्रधान मात्र लंडच्या बॉंड स्ट्रीटवर रोल्स रॉयल्समधून उतरून महागड्या शॉपिंग मॉलमध्ये एन्ट्री घेताना दिसत आहेत. अशावेळी पाकिस्तानातील त्यांचे विरोधक शांत तरी कसे बसणार. या ऐशोआरामावरून ते चांगलेच ट्रोल होत आहेत. यामध्ये पाकिस्तानमधील विरोधी पक्षाचे नेते फवाद हुसैन, माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाच्या नेत्या शफिना इलाही यांनी तर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.
फवाद हुसैन यांचे ट्विट
लंडनच्या बॉंड स्ट्रीटवर शॉपिंग करून नवाज शरीफ पाकिस्तानचे भवितव्य ठरवत आहेत. त्यामुळेच आज देशाची ही अवस्था झालेली आहे, असे ट्विट करतानाच फवाद हुसैन यांनी शरीफ यांचा व्हिडियोही पोस्ट केला आहे. नवाज शरीफ हे पाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेचे फरार आरोपी आहेत. त्यांना ५० रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्यात आलं आहे, असाही उल्लेख त्यांनी ट्विटमध्ये केला आहे.
ब्लड सॅम्पल देत असतील
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तेहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या नेत्या शफिना इलाही यांनीही शरीफ यांच्यावर टीका केली आहे. ‘लंडनमध्ये आलिशान मॉलमध्ये नवाज शरीफ रक्त चाचण्या करायला गेले असतील. ते प्लेटलेट काऊंट करण्यासाठी इथे गेले होते,’ या शब्दांत त्यांनी शॉपिंगचा समाचार घेतला.
https://twitter.com/fawadchaudhry/status/1632356553092378624?s=20
Pakistan EX PM Mall Shopping Troll in Social Media Video