बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मला अजूनही घर मिळालं नाही, मुख्यमंत्र्यांना १० स्मरणपत्रे पाठविली – विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 14, 2022 | 5:31 am
in संमिश्र वार्ता
0
Ambadas Danve

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाकरे आणि शिंदे गटातील विविध प्रकारचा संघर्ष आणि कुरघोड्या दिवसेंदिवस उघड होत आहेत. त्यातच आता समोर आले आहे की, ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना अद्यापही मुंबईत सरकारी निवासस्थान मिळालेले नाही. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना मी १० स्मरणपत्रे पाठविल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून ठाकरे गटातील नेत्यांची कोंडी केली जात असल्याचे दिसून येत आहे.

घरासंदर्भात त्यांनी १० वेळा मुख्यमंत्री शिंदे एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले असून अद्यापही कारवाई झाली नसल्याने दानवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक पाहता विधान सभेचे असो की विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते पद हे मंत्रीपदाच्या दर्जाच्या असते,. त्यामुळे दानवे यांना तातडीने मंत्र्यांप्रमाणे बंगला मिळायला हवा होता. मात्र उद्धव ठाकरे गटाचे निष्ठावान कार्यकर्ते असलेले अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर वारंवार हल्लाबोल केल्याने त्याचा बदला घेतला जात आहे की काय अशी देखील चर्चा सुरू आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना दोन गटामध्ये विभागली आहे. शिंदे यांनी ४० शिवसेना आमदारांसह भाजपसोबत सत्ता स्थापन केली. शिंदे यांनी मुख्यमंत्री तर फडणवीस यांनी उप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. बंडामुळे राज्यात सत्तांतर झाले असून, सत्ताबदलानंतर विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड झाली. तर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर शिवसेनेने दावा केला होता. शिवसेनेने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी मराठवाड्यातील फायरब्रँड नेते अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते.

सत्तांतरानंतर काही माजी मंत्र्यांनी बंगले रिकामे केले नव्हते. त्यामुळे नव्या मंत्र्यांना बंगले देण्यात अडचणी येत होत्या. अखेर अनेक बंगले रिकामे झाल्यानंतर नवनिर्वाचित मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप करण्यात आले आहे. मात्र, या मंत्र्यांना करण्यात आलेल्या बंगले वाटपात शिंदे गटाचे मंत्री दीपक केसकरांना मिळालेला बंगला सगळ्यात भारी असल्याचे म्हटले जात आहे.

महत्वाचे म्हणजे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी असताना असलेला ‘देवगिरी’ बंगला खास बाब म्हणून देण्यात आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अजित पवार यांचे स्नेहसंबंध असल्याने हा बंगला त्यांना मंजूर करण्यात आल्याची चर्चा होती. खरे म्हणजे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यानंतर देवगिरी बंगला हा भव्य मानला जातो. फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवत हा बंगला अजित पवार यांच्याकडे काम ठेवला आहे.

अजित पवार आणि देवगिरी बंगल्याचे नाते अतूट आहे कारण अजित पवारांनी या बंगल्यात जवळपास १६ वर्षाहून अधिक काळ वास्तव्य केले आहे. अजित पवार हे १९९९ ते २०१४ या काळात देवगिरी बंगल्यावरच राहत होते. त्यांनंतर २०१४ ला भाजपची सत्ता आल्यानंतर हा बंगला सुधीर मुनगंटीवार यांना मिळाला. महाविकास आघाडीचे सरकार सन २०१९ आल्यानंतर अजित पवारांना पुन्हा हा बंगला मिळाला होता. मात्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते दानवे यांना मात्र शासकीय निवासस्थानासाठी धडपड करावी लागत आहे. तर मराठवाडयातील शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, अतुल सावे यांना चांगले बंगले मिळाले आहेत, एकेकाळी या मंत्र्यांनी दानवे समवेत अनेक आंदोलनात सहभाग घेतला आहे.

आता विरोधी पक्ष नेत्याला मंत्र्याप्रमाणे शासकीय निवासस्थान, प्रशासकीय कामकाज करण्यासाठी आवश्यक तो अधिकारी-कर्मचारी वर्ग घेता येतो. दानवे यांनी निवासस्थानासाठी ११ ऑगस्टपासून ४ वेळा मुख्यमंत्री कार्यालयाकडे पत्र दिले. अधिवेशन सुरू असताना दानवे यांसदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांना भेटले. दानवे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी यांना भेटून ४ वेळा पाठपुरावा केला. दानवे यांनी ‘प्रतापगड ( अ-५)’ हा बंगला निवासस्थान म्हणून मिळावा, अशी मागणी केली होती. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून मंजुरी मिळाली नसल्याने सामान्य प्रशासन विभागाने निवासस्थानाचे वाटप केलेले नाही, असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. दानवे यांनी निवासस्थानाची मागणी केल्यानंतर दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरीही अद्याप कारवाई झालेली नाही.

Opposition Leader Ambadas Danve Home CM 10 Letters

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अतिशय प्रेरणादायी! या पाच दिव्यांगांचा जीवनप्रवास जाणून घ्याल तर थक्कच व्हाल!

Next Post

महिला व बालविकास विभागाच्या तत्पर मदतीने एका दिव्यांग मुलीला मिळाला कायमस्वरूपी निवारा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
facebook1

महिला व बालविकास विभागाच्या तत्पर मदतीने एका दिव्यांग मुलीला मिळाला कायमस्वरूपी निवारा

ताज्या बातम्या

कौशल्य विकास विभाग बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशेन यांच्यामध्ये सांमजस्य करार 1 1920x1280 1

नाशिक येथील ‘आयटीआय’सह राज्यातील या पाच औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार….विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक

जुलै 9, 2025
Chandrashekhar Bawankule

शेत जमिनीचे भूसंपादन…महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले हे निर्देश…

जुलै 9, 2025
DAM

नाशिक जिल्ह्यातील धरणांची ही आहे स्थिती…बघा, संपूर्ण माहिती

जुलै 9, 2025
Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011