रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ओला दुष्काळ जाहीर न केल्यामुळे शिंदेसरकारचा निषेध करत विरोधी पक्षाचा सभात्याग…

by India Darpan
ऑगस्ट 23, 2022 | 3:54 pm
in राज्य
0
vidhan bhavan

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सरकारने आज ओला दुष्काळ जाहीर करायला हवा होता…शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये आणि फळबागांना हेक्टरी दीड लाखाची मदत द्यायला हवी होती याशिवाय इतर मागण्यांकडेही दुर्लक्ष केल्यामुळे सरकारचा निषेध करत असल्याचे सांगून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज सभात्याग केला.

अतिवृष्टीमुळे शेतजमिनीवरील १८ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या शेतकऱ्यांना शेती उभी करायला वेळ लागणार आहे त्यामुळे या शेतकऱ्यांच्या शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करायला हवे होते. आमची मागणी होती मात्र तेही जाहीर केले नाही असेही अजित पवार म्हणाले. आदिवासी समाजाला खावटी अनुदान द्या त्यांची ती नितांत गरज असते. तोही निर्णय सरकारने घेतला नाही. एनडीआरएफच्या निकषातील मदतीबाबत काही धोरणात्मक निर्णय जाहीर केला नाही. दुप्पट मदत करतो सांगता मात्र तीही तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना जाहीर करता. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरण आम्हाला मान्य नाही असेही अजित पवार यांनी सरकारला सांगितले.

अतिवृष्टीत शेतकऱ्यांची जनावरेही वाहून गेली आहेत त्यांचे पंचनामे झालेले नाहीत. एकीकडे शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचे सरकार जाहीर करत असतानाच आज शेतकरी वीजेचा शॉक घेऊन किंवा रॉकेल ओतून आत्महत्या करण्याची मजल मारत आहेत याबाबत तीव्र नाराजी अजित पवार यांनी व्यक्त केली. सरकारने आजपासून बाधितांना मदत केली जाईल असे जाहीर करायला हवे होते.मात्र तेही जाहीर केले नाही आता पुढच्या महिन्यात ही मदत देण्याचे जाहीर केले आहे. विदर्भात गोगलगायीच्या आक्रमणाबाबतही अधिकार्‍यांना अजून आदेश दिलेला नाही. ज्या अपेक्षेने आम्ही सरकारकडे बघत होतो त्याने आमचे समाधान झाले नाही म्हणून सभात्याग करत असल्याचे अजित पवार यांनी जाहीर करुन सर्व महाविकास आघाडीचे आमदार सभागृहाबाहेर पडले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दहीदंडी फोडताना मृत्यूमुखी पडलेल्या गोविंदा संदेश दळवी यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत

Next Post

‘मराठी आठव दिवस’ उपक्रमांतर्गत कालिदास कलामंदिरात शनिवारी ‘गंध स्वरांचा’

Next Post
IMG 20220823 WA0021 1

'मराठी आठव दिवस' उपक्रमांतर्गत कालिदास कलामंदिरात शनिवारी 'गंध स्वरांचा'

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
unnamed 3

नाशिक जिल्हयात नवीन उद्योग येण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करू…ललित गांधी

मे 31, 2025
Untitled 62

मुख्यमंत्री यांच्या हस्ते रविवारी आरोग्य विद्यापीठाच्या ‘चक्र’ प्रकल्पाचे भूमिपूजन व उद्घाटन

मे 31, 2025
Bridge Day 3 2

नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेत यांना मिळाला विजेतेपद….भारतीय संघांत होणार निवड

मे 31, 2025
bjp11

भाजपाच्या उर्वरित २२ जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा…नाशिकमध्ये यांना संधी

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011