शनिवार, मे 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दहीदंडी फोडताना मृत्यूमुखी पडलेल्या गोविंदा संदेश दळवी यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत

by India Darpan
ऑगस्ट 23, 2022 | 3:54 pm
in इतर
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दहीहंडी उत्सवादरम्यान राज्यभर जे गोविंदा जखमी झाले त्यांना योग्य उपचार मिळावेत जेणेकरून कुणाचा मृत्यू होऊ नये यासाठी नियंत्रण पथकास निर्देश देण्यात आले होते. दुर्देवाने विलेपार्ले येथील संदेश दळवी (२३) यांचा मृत्यू झाला असून, तातडीने कुटूंबियांना दहा लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. आज विधानभवनात विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी जखमी आणि मृत्यूमुखी गोविंदाबाबत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. यास उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना कालावधीत दोन वर्षे सण साजरे करता आले नाही. आता कोरोनाचे सावट कमी झाल्याने पारंपरिक सण साजरे करण्यात येत आहेत. नुकताच दहिहंडी उत्सव साजरा करण्यात आला. या सणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने मृत गोविंदांच्या कुटूंबियांना १० लाख, दोन अवयव गमावल्यांना ७.५० लाख, जखमींना ५ लाख रुपये आणि सर्वांवर मोफत उपचाराची घोषणा केली होती. या सणाच्यावेळी सर्व जखमी गोविंदावर योग्य उपचार व्हावेत, कुणाचाही मृत्यू होऊ नये, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सात अधिकाऱ्यांचे पथक नेमले होते. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्यांशी संपर्क साधण्यात आला होता. याचबरोबर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना जखमी आणि मृत्यूमुखी गोविंदांना तत्काळ आर्थिक मदत देण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.

#दहीहंडी दरम्यान जे गोविंदा जखमी झाले, त्यांना योग्य उपचार मिळावेत, कुणाचा मृत्यू होऊ नये यासाठी नियंत्रण पथकास निर्देश दिले होते. दुर्दैवाने संदेश दळवी यांचा मृत्यू झाला असून तातडीने त्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांचे सहाय्य दिले जाईल-मुख्यमंत्री @mieknathshinde यांची माहिती pic.twitter.com/leP4sM47Ny

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 23, 2022

Dahihandi Govinda Sandesh Dalavi Death 10 Lakh Help
CM Eknath Shinde Announcement

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या तारखेपासून शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत; राज्य सरकारची घोषणा (व्हिडिओ)

Next Post

ओला दुष्काळ जाहीर न केल्यामुळे शिंदेसरकारचा निषेध करत विरोधी पक्षाचा सभात्याग…

Next Post
vidhan bhavan

ओला दुष्काळ जाहीर न केल्यामुळे शिंदेसरकारचा निषेध करत विरोधी पक्षाचा सभात्याग...

ताज्या बातम्या

mahavitarn

नाशिक शहरात रविवारी या भागातील टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा राहणार बंद…

मे 17, 2025
Screenshot 20250517 144809 WhatsApp

छगन भुजबळ यांच्या मोबाईलवर फोन करून १ कोटीची खंडणी उकळण्याचा प्रयत्न….पोलिसांच्या पथकाने मुसक्या आवळल्या

मे 17, 2025
INDIA GOVERMENT

ऑपरेशन सिंदूर….खासदारांच्या या ७ टीम जगाला माहिती देणार..

मे 17, 2025
cbi

सीबीआयने १५ हजार रुपयांची लाच घेणा-या या बँकेच्या अधिकाऱ्याला केली अटक

मे 17, 2025
nagpur1 1024x696 1

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार…. महसूल मंत्र्यांनी दिले निर्देश

मे 17, 2025
Untitled 32

ईडीची मोठी कारवाई…..या बांधकाम घोटाळयात ९ कोटीची कॅश, २३ कोटीचे दागिने व गुन्हेगारी कागदपत्रे जप्त

मे 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011