बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ओप्पो मोबाईल कंपनीच्या मॅनेजरला अटक; तब्बल १९ कोटींच्या प्रकरणात जीएसटी विभागाची कारवाई

by India Darpan
मार्च 23, 2023 | 12:34 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मेसर्स ओपो (OPPO) मोबाईल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, या मूळ चिनी कंपनीचा व्यवस्थापक आणि वित्त आणि लेखा विभागाचा अधिकृत स्वाक्षरीकर्ता, महेंद्र कुमार रावत याला, बनावट पावत्यांद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिटची १९ कोटीची फसवणूक केल्या प्रकरणी, सीजीएसटी भिवंडी आयुक्तालयाने अटक केली आहे.

मुंबई विभागातील सीजीएसटी भिवंडी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रावत याला अटक केली आणि त्याला ३ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. तपासादरम्यान प्राप्त झालेल्या पुराव्यांच्या आधारे, सीजीएसटी कायदा, २०१७ च्या कलम १३२ चे उल्लंघन केल्याबद्दल सीजीएसटी कायदा, २०१७ च्या कलम ६९ अंतर्गत आज त्याला अटक करण्यात आली.

सीजीएसटी भिवंडी आयुक्तालयाच्या फसवणूक विरोधी शाखेने मेसर्स ओपो मोबाईल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (GSTIN – 27AABCO9247K1ZZ) ची चौकशी केली. यामधून ओपो (OPPO) महाराष्ट्र, कोणत्याही मालाची पावती न घेता बनावट ITC मिळवत असल्याचे उघडकीला आले आहे. ओपो (OPPO) मोबाईल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा पुरवठादार, असलेली मेसर्स गेन हिरो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ही कंपनी आपल्या व्यवसायाच्या प्रमुख ठिकाणी अस्तित्वात नसल्याचे आढळून आले.

या संदर्भात, या व्यवहाराची सोळा ई-वे बिले (सीमा शुल्क पावत्या) पडताळण्यात आली, आणि ती बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर, वाहतूकदार आणि वाहन मालक यांचे जबाब नोंदवण्यात आले. यामधून, ओपो महाराष्ट्रला मालाचा पुरवठा होत नसल्याचे उघड झाले.

या प्रकरणी, कंपनीचे व्यवस्थापक आणि वित्त आणि लेख विभागाचे अधिकृत स्वाक्षरीकर्ता, महेंद्र कुमार रावत, प्रमुख आरोपी असून, त्याने गेन हिरो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ने कोणताही माल न घेता जारी केलेल्या 107,08,56,072/- रुपयांच्या ITCच्या बदल्यात, 19,27,54,093/- रुपयांच्या बनावट पावत्या मिळवल्या होत्या. या पावत्या बनावट असल्याचा जबाब त्याने नोंदवला आहे.

हे प्रकरण, सीजीएसटी मुंबई विभागाने कर फसवणूक करणार्‍या आणि कर चुकवणार्‍यांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग आहे. आतापर्यंत सीजीएसटी भिवंडी आयुक्तालयाने गेल्या १८ महिन्यांतच २४ जणांना अटक केली आहे, अशी माहिती केंद्रीय जीएसटी भिवंडीचे आयुक्त सुमित कुमार यांनी दिली.

Oppo Mobile Company Finance Manager Arrested by CGST Department

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची विधानभवनामध्ये एकत्र एण्ट्री; चर्चांना उधाण (Video)

Next Post

मार्च एण्डसाठी रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व बँकांना दिले हे आदेश…. ग्राहकांना असा होणार फायदा

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

मार्च एण्डसाठी रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व बँकांना दिले हे आदेश.... ग्राहकांना असा होणार फायदा

ताज्या बातम्या

Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011