बुधवार, जुलै 30, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चारधाम यात्रेसाठी या उड्डाणांवर तात्काळ प्रभावाने स्थगिती…दोन्ही वैमानिकांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित

by Gautam Sancheti
जून 16, 2025 | 6:42 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 39

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
“श्री केदारनाथ जी – आर्यन हेलीपॅड, गुप्तकाशी” या मार्गावर कार्यरत असलेले आर्यन एव्हिएशनचे बेल ४०७ हेलिकॉप्टर (नोंदणी क्रमांक व्हीटी-बीकेए) रविवारी एका दुर्दैवी अपघातात कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये पाच प्रवासी, एक लहान बाळ आणि एक क्रू सदस्य होते.

हे हेलिकॉप्टर गुप्तकाशीहून पहाटे ५.१० वाजता उड्डाण करून ५.१८ वाजता श्री केदारनाथ जी हेलीपॅडवर उतरले. नंतर ५.१९ वाजता परत गुप्तकाशीसाठी निघाले आणि साधारण ५.३० ते ५.४५ च्या दरम्यान गौरीकुंडजवळ कोसळले.

प्राथमिक माहितीनुसार, अपघाताचे संभाव्य कारण नियंत्रित उड्डाण असताना कोसळणे (‘कंट्रोल्ड फ्लाइट इंटू टेरेन’ – सीएफआयटी) असल्याचे दिसते, कारण दरीच्या प्रवेश भागात दाट धुके व कमी दृश्यमानता असूनही हेलिकॉप्टर उडत होते. अपघाताचे नेमके कारण समजण्यासाठी विमान अपघात चौकशी विभाग (एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोद्वारे एएआयबी) द्वारे सखोल चौकशी केली जाईल.

अपघात स्थळी एनडीआरएफ व एसडीआरएफच्या पथकाद्वारे सध्या बचावकार्य सुरू आहे. या घटनेनंतर, मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी सकाळी ११ वाजता उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीला उत्तराखंड सरकारचे वरिष्ठ अधिकारी, नागरी विमान वाहतूक विभागाचे सचिव, डीजीसीए आणि संबंधित पथकांचे सदस्य उपस्थित होते. या संदर्भात खालील तात्काळ कृती करण्यात आल्या आहेत:

  1. चारधाम यात्रेसाठी आर्यन एव्हिएशनच्या संचालनावर तात्काळ प्रभावाने स्थगिती घालण्यात आली आहे.
  2. मे. ट्रान्सभारत एव्हिएशनचे व्हीटी-टीबीसी आणि व्हीटी-टीबीएफ हे दोन हेलिकॉप्टर प्रतिकूल हवामान परिस्थितीत उड्डाण करताना आढळल्याने त्यांच्या दोन्ही वैमानिकांचे अनुक्रमे कॅप्टन योगेश ग्रेवाल – CPL(H)-1453 जितेंद्र हरजाई- CPL(H)-1046) यांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहेत.
  3. खबरदारी म्हणून या भागातील सर्व चार्टर व शटल हेलिकॉप्टर सेवा १५ व १६ जून २०२५ रोजी स्थगित करण्यात आल्या आहेत.
  4. सुरक्षा नियमांचे पूर्ण पालन सुनिश्चित करण्यासाठी, सेवा पुन्हा सुरू करण्यापूर्वी सर्व ऑपरेटर आणि वैमानिकांसह व्यापक आढावा बैठक घेण्याचे निर्देश यूसीएडीएला देण्यात आले आहेत.
  5. यूसीएडीए कडून वास्तविक-वेळ संचालनाच्या देखरेखीसाठी एक स्वतंत्र नियंत्रण व समन्वय कक्ष स्थापन करण्यात येणार आहे, जेणेकरून कोणत्याही धोक्याच्या संकेतांची त्वरित माहिती दिली जाऊ शकेल.
  6. केदारनाथ खोऱ्यातील सर्व हेलिकॉप्टर हालचालींवर सक्रियपणे देखरेख करण्यासाठी आणि यूसीएडीएला नियंत्रण व समन्वय कक्षाच्या कामकाजाचा काटेकोरपणे आढावा घेण्यासाठी हवाई योग्यता, सुरक्षा आणि संचालनासाठी अधिकारी तात्काळ नियुक्त करण्याचे निर्देश नागरी उड्डाण मंत्रालयाने दिले आहेत.

विमान वाहतूक सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही आणि कोणत्याही ऑपरेटरने हवामानाशी संबंधित आणि इतर प्रोटोकॉलचे उल्लंघन करून उड्डाणे करू नयेत, असेही नागरी उड्डाण मंत्रालयाने सांगितले आहे. मानवी जीवनाचे पावित्र्य लक्षात घेऊन कोणत्याही परिस्थितीत सर्व तरतुदी पूर्ण अधिकाराने अंमलात आणाव्यात आणि उड्डाण संचालनात शिस्त राखली जाईल याची खात्री करण्याचे निर्देशही नागरी उड्डाण मंत्रालयाने दिले आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी

Next Post

नाशिक येथील द्वारका सर्कल वरील सर्व अतिक्रमण काढले…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Screenshot 20250616 064516 Facebook 1

नाशिक येथील द्वारका सर्कल वरील सर्व अतिक्रमण काढले…

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी पैशाचा अपव्यय काळजीपूर्वक टाळावा, जाणून घ्या, गुरुवार, ३१ जुलैचे राशिभविष्य

जुलै 30, 2025
bjp11

शरद पवार गटाला धक्का….या माजी मंत्रीने त्यांच्या दोन पुत्रांसह केला भाजपामध्ये प्रवेश

जुलै 30, 2025
CM

उद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जुलै 30, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू….

जुलै 30, 2025
trump 1

भारतावर २५ टक्के ट्ररिफ लावण्याची डोनाल्ड ट्रम्पची घोषणा…

जुलै 30, 2025
IMG 20250730 WA0238 1

येवल्यातील विस्थापित गाळे धारकांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक…

जुलै 30, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011