इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – घरबसल्या आवडीचे पदार्थ मागवण्यासाठी झोमॅटोला खाद्यप्रेमींची नेहमीच पसंती असते. आता आणखी या लोकप्रिय अॅपने आणखी एक सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ही सुविधा म्हणजे तुम्ही इतर शहरांमधूनही खाद्यपदार्थ आता मागवू शकता.
झोमॅटोने इंटरसिटी लेजंड्स नावाने इंटरसिटी फूड डिलिव्हरीचा एक पायलट प्रोजेक्ट लाँच केला आहे. या प्रोजेक्टद्वारे दिल्ली एनसीआरच्या काही भागात आणि हैदराबाद, लखनऊसारख्या शहरांमधील रेस्टॉरंट्समधून जेवण ऑर्डर करता येणार आहे. खाद्यपदार्थांचे योग्य पॅकिंग करुन ते विमानाने इतर शहरांमध्ये पोहोचवण्याचे काम कंपनी करणार आहे. तसेच अन्न खराब होऊ नये म्हणून फ्रीजचा वापर केला जाणार आहे.
सध्या ठराविक ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करुन दिली असली तरी भविष्यात देशभरात सर्वत्र त्याचा विस्तार करण्यात येणार आहे. १०० हून अधिक विमानतळ आणि मोठे फूड पॉइंट्स या प्रोजेक्टअंतर्गत आणले जाणार आहेत. यापूर्वी झोमॅटोने १० मिनिटात डिलिव्हरी सेवा पुरवणे सुरु केला होता. ही सेवा गुरुग्रामसारख्या ठिकाणी सुरु करण्यात आली आहे.
रेस्टॉरंटमध्ये ताजे अन्न तयार केल्यावर ते हवाई वाहतूकीदरम्यान सुरुक्षित राहण्यासाठी रियुजेबल आणि टॅम्पर प्रूफ कंटेनरमध्ये पॅक केले जाणार आहे. विमानात ते व्यवस्थित रहावे यासाठी अत्याधुनिक मोबाइल रेफ्रिजरेशनचा वापर केला जाणार आहे. सध्या झोमॅटो ऑनलाइन फूड डिलिव्हरी तसेच किराणा सामान डिलिव्हरी करण्याचे काम करत आहे.
Online Food Delivery Zomato New Service Launch