व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Wednesday, November 29, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

चक्क ग्रामविकास अधिकारीच सांगतो भ्रष्टाचार कसा करायचा! बघा, व्हायरल व्हिडिओ

India Darpan by India Darpan
September 7, 2022 | 5:06 am
in संमिश्र वार्ता
0

बुलढाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भ्रष्टाचाराची कीड किती खोलवर रुजली आहे, याचा प्रत्यय सध्या एका व्हायरल व्हिडिओमधून येत आहे. जिल्ह्यातील डोणगावच्या ग्रामविकास अधिकाऱ्याने चक्क भ्रष्टाचार कसा करायचा याचे धडे दिले. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. याद्वारेच ग्रामीण भागात नक्की कसे काम चालते याची झलकही मिळत आहे. तसेच, नेटकऱ्यांकडून यावर सध्या कमेंटचा पाऊस पडत आहे.

व्हिडिओमध्ये जो संवाद होतो आहे तो असा,  होय, हा ग्रामविकास अधिकारी व्हिडीओमध्ये पैसे खाणे हा तुम्हाला बहाल केलेला अधिकार असल्याचे म्हणतो. पैसे खाणे हा तुम्हाला बहाल केलेला अधिकार आहे. असे ग्रामविकास अधिकारीच महिला सरपंचाला धडे देत आहे. मेहकर तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, लिपिक आणि महिला सरपंचाच्या वार्तालापाचा हा व्हिडिओ आहे. ग्रामविकास अधिकारी आणि लिपिक हे महिला सरपंचाला पैसे कसे खायचे?, ते धडे देताना दिसत आहेत.

डोणगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर चणखोरे हे नेहमीच या ना त्या कारणाने वादग्रस्त ठरलेले आहेत. त्यांच्याविषयी अनेकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. मात्र ग्रामविकास अधिकारी चनखोरेंवर राजकीय आशीर्वाद असल्याने त्यांच्यावर अद्यापही कारवाई झाली नाही. त्यातच आता या ग्रामविकास अधिकारी, लिपिक आणि महिला सरपंच यांच्या वार्तालापाचा व्हिडिओ समोर आला आहे..
या व्हिडिओमध्ये ग्रामविकास अधिकारीच महिला सरपंच रेखा पांडव यांना पैसे कैसे खायचे? ते धडे देताना दिसतात.

जनता ही चोर असून चोरांनी पैसे घेऊन मतदान केले. त्यामुळे पावसाळा आला की डोळे, कान बंद करुन टाकायचे. जसे जळलं तसे जळू द्यायचे, असा सल्लाही ग्रामविकास अधिकारी चनखोरे सरपंचाला देतो. इतकेच पैसे खाणे हा तुम्हाला बहाल केलेला अधिकार असल्याचे ही ग्रामविकास अधिकारी सरपंचाला सांगत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतमध्ये अनेक कामांत भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आणि सरपंचावर चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ चरण आखाडे यांनी केली.

Buldana : डोनगावचे ग्रामविकास अधिकारी देतात महिला सरपंचांना धडे, कशाचे? दोन नंबरचे पैसे कसे खातात याचे… pic.twitter.com/RuXgPAeDiG

— Govind Hatwar (@GovindHatwar) August 30, 2022

Block Development Officer Corruption Dialogue Video


Tags: BDOBlock Development OfficerBribeCorruptionDialogueViral Video
Previous Post

मराठवाडा मुक्ती गाथा: रुई-रामेश्वरला पेशवे – निजाम भेटी मागची कथा..!!

Next Post

खवय्यांसाठी गुडन्यूज! झोमॅटो आता ही सेवाही देणार

Next Post

खवय्यांसाठी गुडन्यूज! झोमॅटो आता ही सेवाही देणार

ताज्या बातम्या

नाशिकच्या डिफेन्स पार्कसाठी राज्य शासनाकडून केंद्राला शिफारस….खा.गोडसे यांनी दिली ही माहिती

November 29, 2023

बीसीआयची मोठी घोषणा….राहुल द्रविडच भारतीय संघाचा मुख्य कोच राहणार…बदलाच्या चर्चेला दिला पूर्णविराम

November 29, 2023

चांदवड तालुक्यात बाळासाहेब थोरात नुकसानग्रस्त शेतक-यांच्या बांधावर…सरकारवर केली ही टीका

November 29, 2023

अंगणवाडी सेविकांच्या हिताचे राज्य शासनाने घेतले हे विविध महत्त्वपूर्ण निर्णय

November 29, 2023

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून….वादळी चर्चा, आंदोलन व घोषणांचा पाऊस

November 29, 2023

नाशिक पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन….५६८ सार्वजनिक ठिकाणी मद्यपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल (बघा व्हिडिओ)

November 29, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.