मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असतांना शासनाकडून अद्याप मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही. सभागृहात वारंवार मागणी करून देखील सरकारकडून तोडाला पाने पुसली जात आहे. तसेच राज्यात शेतकरी आत्महत्या होत असतांना राज्याच्या कृषी मंत्र्याकडून संवेदनाहीन वक्तव्य केली जात आहे. याचा निषेध व्यक्त करत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान ५०० रुपये अनुदान द्या अशी मागणी केली. तसेच अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याने त्यांनी सभागृहातून वॉक आउट करत सकारचा निषेध नोंदविला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात नियम ५७ अन्वये प्रस्ताव मांडला. तो चर्चिला गेला नसल्याने त्यांनी सभागृहाचे या गंभीर प्रश्नाकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. यावेळी ते म्हणाले की, राज्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र शासनाकडून अद्याप कुठलीही मदत शेतकऱ्यांना घोषित करण्यात आलेली नाही. सरकारकडून तोंडाला पाने पुसली जात आहे. शेतकरी अडचणीत असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यावर राज्याचे कृषी मंत्र्यांनी संवेदनाहीन अशी टिपणी केली. ही बाब अतिशय दुर्दैवी असून या वक्तव्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
ते म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पिकासाठी १२०० रुपये खर्च येत आहे. मात्र कांद्याला आज ५०० रुपये तर जास्तीत जास्त ७०० रुपये भाव मिळत ही सद्याची परिस्थिती आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने केवळ ३०० रुपये मदत जाहीर केली आहे. ही मदत तुटपुंजी असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान ५०० रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. तसेच या गंभीर बाबीकडे लक्ष वेधत सभागृहातून वॉक आउट करत सकारचा निषेध नोंदविला.
https://twitter.com/ChhaganCBhujbal/status/1635183056813432834?s=20
Onion Farmers Help Opposition Demand 500 Rupees
Maharashtra Assembly Session