India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान ५०० रुपये अनुदान द्या; विरोधकांची सभागृहात आग्रही मागणी

India Darpan by India Darpan
March 13, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असतांना शासनाकडून अद्याप मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही. सभागृहात वारंवार मागणी करून देखील सरकारकडून तोडाला पाने पुसली जात आहे. तसेच राज्यात शेतकरी आत्महत्या होत असतांना राज्याच्या कृषी मंत्र्याकडून संवेदनाहीन वक्तव्य केली जात आहे. याचा निषेध व्यक्त करत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान ५०० रुपये अनुदान द्या अशी मागणी केली. तसेच अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याने त्यांनी सभागृहातून वॉक आउट करत सकारचा निषेध नोंदविला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात नियम ५७ अन्वये प्रस्ताव मांडला. तो चर्चिला गेला नसल्याने त्यांनी सभागृहाचे या गंभीर प्रश्नाकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. यावेळी ते म्हणाले की, राज्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र शासनाकडून अद्याप कुठलीही मदत शेतकऱ्यांना घोषित करण्यात आलेली नाही. सरकारकडून तोंडाला पाने पुसली जात आहे. शेतकरी अडचणीत असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यावर राज्याचे कृषी मंत्र्यांनी संवेदनाहीन अशी टिपणी केली. ही बाब अतिशय दुर्दैवी असून या वक्तव्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

ते म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पिकासाठी १२०० रुपये खर्च येत आहे. मात्र कांद्याला आज ५०० रुपये तर जास्तीत जास्त ७०० रुपये भाव मिळत ही सद्याची परिस्थिती आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने केवळ ३०० रुपये मदत जाहीर केली आहे. ही मदत तुटपुंजी असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान ५०० रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. तसेच या गंभीर बाबीकडे लक्ष वेधत सभागृहातून वॉक आउट करत सकारचा निषेध नोंदविला.

कांद्याच्या उत्पादन व वाहतूक खर्चात वाढ झालेली असल्याने क्विंटलमागे किमान १००० रुपये अनुदान मिळावे अशी शेतकऱ्याची अपेक्षा होती. पण निदान ५०० रुपये तरी मिळावे, अशी मागणी आम्ही केली होती. परंतु सरकारने फक्त ३०० रुपये अनुदान देण्याची घोषणा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत pic.twitter.com/CpIc9spw7T

— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) March 13, 2023

Onion Farmers Help Opposition Demand 500 Rupees
Maharashtra Assembly Session


Previous Post

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; प्रति क्विंटल एवढे सानुग्रह अनुदान जाहीर, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Next Post

या कृषिमंत्र्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय… अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याविरोधात मविआचे आमदार आक्रमक (Video)

Next Post

या कृषिमंत्र्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय... अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याविरोधात मविआचे आमदार आक्रमक (Video)

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group