नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या काळात सर्वाधिक वापराची वस्तू कोणती असेल तर ती म्हणजे मोबाईल होय, कारण अन्न, वस्त्र निवाऱ्याप्रमाणे आता मोबाईल देखील माणसाची मूलभूत गरज बनली आहे असेच म्हणावे लागेल. मोबाईलसह चार्जर देखील महत्त्वाचा भाग बनला आहे. कारण चार्जरशिवाय मोबाईल सुरुच होऊ शकत नाही. भारतात आता एक देश, एक चार्जर या धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांचे चार्जर वेगवेगळे असतात. यामुळे बऱ्याचदा अडचणींचा सामना करावा लागतो. काही कंपनी फोनच्या रिटेल बॉक्समध्ये चार्जर देत नाही. त्यामुळे वेगळा चार्जर खरेदी करावा लागतो. विशेषतः सोबत चार्जर नसल्यास अथवा कुठे बाहेर गेल्यात चार्जरची शोधा शोध करावी लागले. मात्र, आता चार्जर शोधण्याच्या झंझटपासून मुक्तता मिळणार आहे.
सर्व कंपन्यांच्या मोबाईल साठी एकच चार्जर वापरात आणण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. यामुळे येत्या काळात सर्व मोबाईल ला एकच चार्जर लागेल अशा प्रकारचे चार्जर उपलब्ध करून दिले जाणार आहे. सध्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या मोबईलचे चार्जर देखील वेगवेगळे आहेत. यामुळे सर्व प्रकारच्या मोबाईलसाठी एकाच डिझाइनचा चार्जर असावा, असे या धोरणात निश्चित करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने मोबाईल क्षेत्रातील उद्योगांची काही महिन्यांपूर्वी बैठक घेतली. इलेक्ट्रॉनिक गॅझेट दोन प्रकारात विभागून त्यांच्यासाठी एकसमान सामान्य चार्जर ठेवता येईल का हा बैठकीचा अजेंडा होता. जे मोठ्या आकाराचे गॅझेट आहेत. लॅपटॉप आणि टॅब इ. त्यांच्यासाठी श्रेणी सेट करून एकसमान डिझाइनचे चार्जर असू उपलब्ध करुन देण्याची योजना सांगण्यात आली. तसेच मोबाईल फोनसह, इअरबड्स, हेडफोन्स, स्मार्टवॉच, हेल्थ गॅजेट्स आणि स्पीकर यांसारख्या लहान किंवा मध्यम आकाराच्या गॅझेट्ससाठी एक प्रकारची चार्जिंग सिस्टीम असावी. यासाठी टाइप-सी चार्जर असावा. यासोबतच प्रीमियम उपकरणांसाठी वेगळा चार्जर असावा यावर चर्चा करण्यात आली.
सर्व प्रकारच्या गॅझेट्ससाठी समान Type-C चार्जर असावे यावर बैठकीत निश्चिती झाली. आणि त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. अशा प्रकारचा चार्जर वापरात आल्यास मोठ्या प्रमाणात होणारा ई-कचरा रोखण्यास मदत होईल, असा सरकारला विश्वास आहे. यामुळे प्रत्येक वेळी चार्जर खराब झाल्यावर नवीन चार्जर खरेदी करण्याची गरज भासणार नाही. वेगवेगळ्या प्रकारचे चार्जर सोबत ठेवण्याच्या त्रासातून देखील सुटका होणार आहे. आणि सर्वांनाच ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
Union Government Big Relief to Mobile Customers
Same Mobile Charger Single Charger Type C
One Nation One Charger Policy In India