नवी दिल्ली – सुमारे दीड ते दोन वर्षांपासून जगभरात ‘कोरोना-केरोना’ असा एकच शब्द सर्वत्र ऐकू येत असताना आता नव्याने ‘ओमिक्रॉन- ओमिक्रॉन ‘ हा एकच शब्दच सर्वत्र ऐकू येऊ लागला आहे. कारण या नव्या विषाणूने जगभरातील अनेक देशांमध्ये आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.
इतकेच नव्हे विषाणूचा नवीन प्रकार म्हणजेच ओमिक्रॉन अवघ्या ९ दिवसांत ३० देशांमध्ये पसरला आहे. आपल्यासाठी सर्वात चिंतेची बाब म्हणजे दक्षिण आफ्रिकेपासून सुरू झालेला हा प्रकार आता भारतात पोहोचला आहे. आणखी भयानक गोष्ट म्हणजे या प्रकाराचा प्रसार डेल्टा प्रकारापेक्षा अनेक पटीने जास्त आहे. डेल्टा प्रकारामुळे भारतात दुसरी लाट आली. ओमिक्रॉनने आतापर्यंत कोणकोणत्या देशांमध्ये शिरकाव केला आहे? आणि डेल्टा पेक्षाही तो किती धोकादायक आहे ? हे जाणून घेऊ या…
या देशांमध्ये वेगाने पसरतोय
– २४ नोव्हेंबर: दक्षिण आफ्रिका आणि बोत्सवानामध्ये प्रथम बाधितांची नोंद झाली.
-२६ नोव्हेंबर : जागतिक आरोग्य संघटनेने या प्रकाराला ‘ओमिक्रॉन’ असे नाव दिले. नेदरलँड, इस्रायल, हाँगकाँग आणि बेल्जियम या आणखी चार देशांमध्ये त्याचा प्रसार झाला.
-२७ नोव्हेंबर: ऑमिक्रॉनने ऑस्ट्रेलिया, झेक प्रजासत्ताक, इटली, जर्मनी आणि यूकेमध्येही दस्तक दिली.
-२८ नोव्हेंबर : ओमिक्रॉनने डेन्मार्क आणि ऑस्ट्रिया या आणखी दोन देशांमध्येही पोहोचले
-२९ नोव्हेंबर: कॅनडा, स्वीडन, स्पेन आणि स्वित्झर्लंडमध्येही या प्रकाराची लागण झालेले लोक आढळून आले.
-३० नोव्हेंबर : फ्रान्स, जपान आणि पोर्तुगालमध्ये देखील ओमिक्रॉन-संक्रमित प्रकरणांची पुष्टी झाली.
-१ डिसेंबर: ओमिक्रॉन आणखी नऊ देशांमध्ये पसरला. यामध्ये सौदी अरेबिया, ब्राझील, दक्षिण कोरिया, यूएसए, नॉर्वे, आयर्लंड, घाना, नायजेरिया, यूएई यांचा समावेश आहे.
ओमिक्रॉन की डेल्टाः कोण जास्त धोकादायक?
डेल्टा : डेल्टा व्हेरियंटच्या स्पाइक प्रोटीनमध्ये एकूण १८ म्युटेशन (उत्परिवर्तन ) होते. तर हा नवा विषाणू केवळ स्पाइक प्रोटीनद्वारे शरीरात प्रवेश करतो. डेल्टा व्हेरियंटमध्ये फक्त २ उत्परिवर्तन होते. तर रिसेप्टर बाइंडिंग डोमेन हा विषाणूचा भाग असून मानवी शरीराच्या पेशीच्या संपर्कात येतो.
कोण किती वेगाने पसरतोय
– ओमिक्रॉनचे आर व्हॅल्यू डेल्टाच्या तुलनेत सहा पटीने जास्त आहे, याचा अर्थ असा की ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला रुग्ण सुमारे ४० जणांना संसर्ग पसरवतो. डेल्टा प्रकाराचे आर मूल्य ७ होते. याचा अर्थ असा की डेल्टा वेरिएंटने संक्रमित व्यक्ती ७ जणांमध्ये विषाणू पसरवू शकते.
लस किती प्रभावी
ओमिक्रॉन प्रकारातील स्पाइक प्रोटीनमध्ये ३० पेक्षा जास्त उत्परिवर्तनांमुळे, सध्याच्या लसी त्यावर फारच कमी प्रभावी ठरतील अशी अपेक्षा आहे. डेल्टा प्रकारावर कोविशील्ड लस खूप प्रभावी होती. या लसीची परिणामकारकता ६३ टक्के होती
दोघांची लक्षणे कशी वेगळी?
ओमिक्रॉनची लक्षणे डेल्टाच्या लक्षणांपेक्षा थोडी वेगळी असू शकतात. उदाहरणार्थ, ओमिक्रॉन झालेल्या रुग्णाला चव किंवा वास येत नाही, तर डेल्टा मध्ये तसे होत नाही. डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे की, सध्या असा कोणताही पुरावा नाही. ओमिक्रॉनची लक्षणे कोरोनाच्या पूर्वीच्या प्रकारांपेक्षा वेगळी आहेत. याचा अर्थ, चव आणि वास कमी होणे वगळता, डेल्टा आणि ओमिक्रॉनची प्रमुख लक्षणे सारखीच आहेत, उदा. घसा खवखवणे, ताप, थकवा आणि डोकेदुखी ही लक्षणे दिसणे होय.
या देशांनी बंद केल्या सीमा
ओमिक्रॉनची वाढती प्रकरणे पाहता इस्रायल, जपान आणि मोरोक्कोने त्यांच्या सीमा सील केल्या आहेत. इस्रायलने परदेशातून येणाऱ्या लोकांना पुढील १४ दिवसांसाठी देशात येण्यास बंदी घातली आहे. परदेशातून येणाऱ्या लोकांसाठी जपानने आपल्या सीमा एका महिन्यासाठी बंद केल्या आहेत. तर मोरोक्कोने इतर देशांमधून येणारी सर्व उड्डाणे दोन आठवड्यांसाठी स्थगित केली आहेत.