इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. ब्रजराजनगर येथील गांधी चौकात एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यानंतर नाबा दास यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. नबा दास यांच्या छातीवर गोळी लागली होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचे निधन झाले आहे.
ब्रजराजनगर एसडीपीओ गुप्तेश्वर भोई यांनी सांगितले की, सहायक पोलिस उपनिरीक्षक (एएसआय) गोपाल दास याने मंत्र्यावर गोळीबार केला. या घटनेत मंत्री जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. भोई म्हणाले की, स्थानिक लोकांनी आरोपी एएसआयला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. एएसआयने मंत्र्यावर गोळीबार का केला याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
SDPO च्या म्हणण्यानुसार, ब्रजराजनगर शहरात दुपारी 1 च्या सुमारास ही घटना घडली. जेव्हा दास एका बैठकीला जात होते. जखमी मंत्र्यांना प्रथम झारसुगुडा जिल्हा मुख्यालय रुग्णालयात नेण्यात आले, परंतु नंतर त्यांना चांगल्या उपचारांसाठी भुवनेश्वर येथील रुग्णालयात विमानाने नेण्याची व्यवस्था करण्यात आली. दास यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर शहरात तणावाचे वातावरण होते. मंत्र्यांच्या समर्थकांनी त्यांच्या सुरक्षेतील त्रुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दास यांना लक्ष्य करण्याचा कट असल्याचा आरोप काही समर्थकांनी केला. एसडीपीओने सांगितले की, आरोपी एएसआयला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. घटनेची सखोल चौकशी केल्यानंतरच अधिक माहिती समोर येईल.
नाबा दास यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. दरम्यान, मंत्री नाबा दास यांना विमानाने भुवनेश्वरला नेण्यात आले. आरोग्यमंत्र्यांवर झालेल्या हल्ल्याची माहिती मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना देण्यात आली आहे. दास यांना भेटण्यासाठी ते भुवनेश्वरमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये पोहोचले. नबा दास हे बीजेडीचे ज्येष्ठ नेते होते. अलीकडेच ते शनि मंदिरात १.७ किलो सोन्याचा कलश अर्पण केल्याने प्रसिद्धीझोतात आले होते.
Terrible news from Odisha. Odisha’s Health Minister Naba Kisore Das fired at by a security person. He has been rushed to the hospital in serious condition after sustaining bullet injury. One more person injured. More details are awaited.
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) January 29, 2023
गुन्हे शाखाकडे तपास
या हल्ल्यानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे वक्तव्य समोर आले आहे. ते म्हणाले, या हल्ल्याच्या दुर्दैवी घटनेने मला धक्का बसला आहे. मी याचा तीव्र निषेध करतो आणि त्यांना लवकरात लवकर बरे होवो ही प्रार्थना करतो. या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश गुन्हे शाखेला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्यास सांगण्यात आले आहे.
आरोपीची पत्नी म्हणते…
वृत्तानुसार, एएसआय गोपाल दास याने ओडिशाच्या आरोग्यमंत्र्यांवर पाच राऊंड गोळीबार केला. या घटनेनंतर आरोपी एएसआयच्या पत्नीचे वक्तव्यही समोर आले आहे. तिनी सांगितले की, घटनेपूर्वी गोपालने मुलीला व्हिडिओ कॉल केला आणि तो तिच्याशी बोलला होता. गोळीबाराच्या घटनेची मला काहीच माहिती नाही. ही घटना मला बातमीच्या माध्यमातूनच कळली. मी सकाळपासून गोपालशी बोलली नाही. पाच महिन्यांपूर्वी तो शेवटचा घरी आला होता.
Odisha Health Minister Shot by ASI in Public Program