India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

१.६४ कोटी रोकड… ६५० ग्रॅम सोने… ३ इमारती, ५ भूखंड, २ वाहने जप्त… लाचखोरांकडे सापडले मोठे घबाड

India Darpan by India Darpan
March 5, 2023
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लाचखोरीला सध्या सरकारी विभागांमध्ये मोठा ऊत आला आहे. ओडिसामध्येही हेच चित्र आहे. लाचलुचपत विभागाने लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. भवानीपटना येथील लघु पाटबंधारे विभागाचे अतिरिक्त मुख्य अभियंता कंदर्पा प्रधान यांना अटक करण्यात आली. तत्पूर्वी खुर्दा, अंगुल आणि कालाहंडी जिल्ह्यातील आठ ठिकाणी सुमारे २४ तास शोध मोहिम चालली. ओडिशा सरकारच्या दोन अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारप्रकरणी ही अटक करण्यात आली.

खाण संचालनालयाचे अतिरिक्त संचालक उमेश चंद्र जेना यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १.६४ कोटी रुपये रोख, ६५० ग्रॅम सोन्याचे दागिने, भुवनेश्वरमधील एका बहुमजली इमारतीची कागदपत्रे, केओंझरमधील तीन इमारती आणि पाच भूखंड, दोन चारचाकी वाहने आणि दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

दक्षता विभागाने सांगितले की, भवानीपटना येथील लघु पाटबंधारे विभागाचे अतिरिक्त मुख्य अभियंता कंदर्पा प्रधान यांना खुर्दा, अंगुल आणि कालाहंडी जिल्ह्यातील आठ ठिकाणी सुमारे २४ तास चाललेल्या शोध मोहिमेनंतर अटक करण्यात आली. भुवनेश्वरमधील तीन फ्लॅट, अंगुल शहरातील दोन इमारती आणि पाच प्लॉटची कागदपत्रे, दोन चारचाकी वाहने, एक मोटारसायकल आणि ६५० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू असल्याचे दक्षता संचालक यशवंत जेठवा यांनी सांगितले.

Odisha Crime Corruption Bribe 2 Officers Arrested


Previous Post

कांदा उत्पादक आणखी आक्रमक; आता थेट विधानभवनाला घेराव घालण्याचा इशारा

Next Post

माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कुठल्याही क्षणी अटक; पोलिस पथक घरी पोहचले

Next Post

माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कुठल्याही क्षणी अटक; पोलिस पथक घरी पोहचले

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 22, 2023

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group