इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लाचखोरीला सध्या सरकारी विभागांमध्ये मोठा ऊत आला आहे. ओडिसामध्येही हेच चित्र आहे. लाचलुचपत विभागाने लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. भवानीपटना येथील लघु पाटबंधारे विभागाचे अतिरिक्त मुख्य अभियंता कंदर्पा प्रधान यांना अटक करण्यात आली. तत्पूर्वी खुर्दा, अंगुल आणि कालाहंडी जिल्ह्यातील आठ ठिकाणी सुमारे २४ तास शोध मोहिम चालली. ओडिशा सरकारच्या दोन अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारप्रकरणी ही अटक करण्यात आली.
खाण संचालनालयाचे अतिरिक्त संचालक उमेश चंद्र जेना यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १.६४ कोटी रुपये रोख, ६५० ग्रॅम सोन्याचे दागिने, भुवनेश्वरमधील एका बहुमजली इमारतीची कागदपत्रे, केओंझरमधील तीन इमारती आणि पाच भूखंड, दोन चारचाकी वाहने आणि दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
दक्षता विभागाने सांगितले की, भवानीपटना येथील लघु पाटबंधारे विभागाचे अतिरिक्त मुख्य अभियंता कंदर्पा प्रधान यांना खुर्दा, अंगुल आणि कालाहंडी जिल्ह्यातील आठ ठिकाणी सुमारे २४ तास चाललेल्या शोध मोहिमेनंतर अटक करण्यात आली. भुवनेश्वरमधील तीन फ्लॅट, अंगुल शहरातील दोन इमारती आणि पाच प्लॉटची कागदपत्रे, दोन चारचाकी वाहने, एक मोटारसायकल आणि ६५० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू असल्याचे दक्षता संचालक यशवंत जेठवा यांनी सांगितले.
Odisha Crime Corruption Bribe 2 Officers Arrested